अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक व्यापार युद्ध सुरू.
भारत, रशिया, चीनसह २० देश अमेरिकेच्या विरोधात एकत्र.
तियानजिन (चीन) येथे होणाऱ्या SCO शिखर परिषदेत चर्चा अपेक्षित.
मोदी, पुतीन आणि जागतिक नेते अमेरिकन टॅरिफला ठोस उत्तर देणार.
अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जागतिक टॅरिफ युद्ध सुरू झालंय. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केलाय. जो देश रशियाकडून तेल खरेदी करेल त्या देशाला टॅरिफचा भार सोसावा लागेल, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत. आता ट्रम्प यांच्याविरोधात २० देशाच्या प्रमुखांनी मोट बांधणी सुरू केली असून चीनमधून ते टॅरिफला जबर उत्तर देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
चीनच्या धरतीवरून अमेरिकन टॅरिफला जोरदार उत्तर मिळण्याची शक्यता आहे. चीनच्या तियानजिनमध्ये शांघाय सहयोग संघटनेचं शिखर संमेलन होणार आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यासह २० देशांचे प्रमुख या परिषदेत सहभागी होणार आहेत. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात होणाऱ्या या संमेलनासाठी संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस आणि ९ अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.
दरम्यान शिखर संमेलनासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ वर्षांनी पहिल्यांदा चीनचा दौरा करणार आहेत. मागील वर्षी रशियातील कजान येथे ब्रिक्स शिखर संमेलनात शी जिनपिंग आणि पुतीन यांच्यासोबत मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी पाश्चिमात्य नेत्यांनी युक्रेन युद्धामुळे रशियापासून दोन हाताचे अंतर ठेवले होते. मागील वर्षी नवी दिल्लीत रशियाचे दूतावास अधिकाऱ्यांनी लवकरच चीन आणि भारतासोबत त्रिपक्षीय चर्चा होईल, असं विधान केले होतं.
दरम्यान आता होणाऱ्या परिषदेवरून द चायना ग्लोबल साऊथ प्रोजेक्टचे संपादक एरिक ओलांडर यांनी मोठा दावा केलाय. या शिखर संमेलनाबाबत बोलताना ते म्हणाले, शी जिनपिंग अमेरिकन नेतृत्वानंतर आंतरराष्ट्रीय व्यवस्था असेन हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. जानेवारीपासून अमेरिका रशिया, चीन, इराण आणि भारताविरोधात निर्णय घेत आहे. पण अमेरिकेचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरू लागले आहेत.
दरम्यान एससीओ शिखर संमेलनाचं नेतृत्व शी जिनपिंग करत आहेत. त्याचवेळी सर्व सदस्य देश एकत्रित संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करतील. एससीओ विकास रणनीती मंजूर करेल. सुरक्षा आणि आर्थिक मदत वाढवण्यावर चर्चा होऊ शकते. या घोषणा पत्रातून अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींचा चीन दौरा हा दोन्ही देशांमधील शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय संबंधांसाठी अत्यंत महत्त्वाचा असेन, असं चीनचे भारतातील राजदूत झू फेईहोंग यांनी गुरुवारी सांगितलं होतं. चीन या भेटीला खूप महत्त्व देत असून ही केवळ एससीओसाठीच नव्हे तर दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांसाठीही एक महत्त्वाची घटना भेट असणार आहे. ही भेट यशस्वी करण्यासाठी चीन आणि भारताचा एक कार्यगट तयारी करत आहे, असेही चीनच्या राजदुतांनी सांगितलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.