chattisgarh teacher viral video Saam TV
देश विदेश

दारुच्या नशेत शिक्षक शाळेत, मुलांना केली मारहाण, Video Viral होताच निलंबीत

घटना दुलदुला विकास गटातील कस्तुरा येथील माध्यमिक शाळेची आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कुमार असे या नशेडी शिक्षकाचे नाव आहे.

वृत्तसंस्था

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात दारू पिऊन शाळेत पोहोचलेल्या शिक्षकाने गोंधळ घातला. मुले आणि त्यांच्या कुटुंबियांशी गैरवर्तन केले. नशेत शिक्षक शाळेत पोहोचताच त्यांनी सर्वप्रथम मुलांना गोंधळ घालण्यास सांगितले. मात्र त्यांचे म्हणणे न ऐकताच नशा केलेल्या शिक्षकाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एकढेच नाहीतर हे महाशय शिक्षकांच्या स्टापरुममध्ये गेले आणि तिथे पडले अन् तसेच झोपी गेले. नशेच्या आहारी गेलेल्या शिक्षकाची माहिती मुलांच्या घरच्यांना कळताच त्यांनी शाळेत पोहोचून घटनेचा व्हिडिओ बनवला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

घटना दुलदुला विकास गटातील कस्तुरा येथील माध्यमिक शाळेची आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कुमार असे या नशेडी शिक्षकाचे नाव आहे. गुरुवारी मुले वर्गात पोहोचली तेव्हा शिक्षक दिनेश कुमार मद्यधुंद अवस्थेत तिथे बसले होते. मुलांसमोर ते इकडे तिकडे बोलू लागला. मुलांच्या म्हणण्यानुसार, त्यानी मुलांना वर्गात गोंधळ घालण्यास सांगितले, परंतु मुलांनी तसे केले नाही. यावर दिनेश कुमारने एका बाजूने मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. शिक्षकाचे हे कृत्य पाहून काही मुलांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना याची माहिती दिली. शिक्षक दारूच्या नशेत असल्याचे समजताच कुटुंबीय मोठ्या संख्येने शाळेत पोहोचू लागले.

शाळेतील इतर शिक्षकांनी नशेत असलेल्या शिक्षकाला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काही शुद्धीवर आले नाहीत. संबंधीत शिक्षक कुटुंबातील सदस्यांसमोरही शुद्धीवर नव्हते. तो इतका दारूच्या नशेत होता की त्याला तो काय बोलतोय ते कळतही नव्हते. शेवटी शिक्षक शाळेतील एका खोलीत गेला आणि तिथे जमिनीवर झोपला. त्याचवेळी, शिक्षक दारूच्या नशेत येण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचा आरोप मुलांनी केला आहे. याआधीही तो मद्यधुंद अवस्थेत शाळेत आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन,पुण्यातील पुणे हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

खळबळजनक! बायको हॉस्पिटलमध्ये बेडवर, नवरा अचानक रुममध्ये शिरला, क्षणात भयंकर घडलं

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे करणार उद्धव ठाकरेंना मदत? भाजपची कोंडी करण्यासाठी दोघांमध्ये नेमकं काय ठरलंय?

Walmik Karad: संतोष देशमूख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड तुरुंगातून बाहेर येणार? कथित कॉल रेकॉर्डिंगनं उडवली खळबळ

Maharashtra Scholarship Exam: उच्च जातीचं नाव काय? शिष्यवृत्तीच्या परिक्षेत जातीचा 'सराव'

SCROLL FOR NEXT