२७ डिसेंबरला शाळेला सुट्ट्या
उत्तर प्रदेशमध्ये सुट्टी जाहीर
विद्यार्थ्यांना मिळणार लाँग वीकेंड
डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, या महिन्यात विद्यार्थ्यांना खूप सुट्ट्या मिळणार आहेत. वर्षाचा शेवटचा महिना असल्याने विद्यार्थ्यांना पालकांसोबत फिरायला जाण्याचीही संधी मिळत आहे.आता २७ डिसेंबरलादेखील शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालये बंद असणार आहे. २७ तारखेला सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केलेत.
उत्तर प्रदेशमध्ये शाळांना सुट्ट्या
उत्तर प्रदेशमध्ये उन्नाव जिल्ह्याचे दंडाधिकारी गौरांग राठी यांनी २७ डिसेंबरला सुट्टी जाहीर केली आहे. हा दिवस श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणार आहेत. राज्य सरकारने १७ डिसेंबर २०२४ रोजी २०२५ च्या सुट्ट्यांमध्ये बदल केला. यावर्षी गुरु गोविंद सिंह जी यांची जयंती २७ डिसेंबरला आहे. त्यामुळे सरकारने या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.
२७ डिसेंबरला जिल्हा प्रशासन, तहसील, शाळा महाविद्यालये बंद असणार आहे. याचसोबत बँका आणि इतर महत्त्वाची कार्यालये बंद राहण्याची शक्यता आहे. २७ डिसेंबरला शनिवार आहे आणि २८ डिसेंबरला रविवार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सलग दोन दिवस सुट्टी मिळणार आहे.
ख्रिसमस आणि इतर सुट्ट्या
देशात अनेक ठिकाणी २४ डिसेंबरला ख्रिसमस ईव्ह आणि २५ डिसेंबरला ख्रिसमसमुळे शाळा बंद असणार आहे. यानंतर पुन्हा नववर्षानिमित्त सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात खूप सुट्ट्या मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच लाँग वीकेंड मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.