School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

School Holiday Today Due To Heavy Rainfall: आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा जोर आज वाढत आहे. मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
School Holiday Today
School Holiday TodaySaam Tv
Published On

राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये जोरात पाऊस कोसळत आहे. आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. अजून पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड येथील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. (School Closed Today In Mumbai, Thane, Navi Mumbai, Raigad, Palghar)

School Holiday Today
Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

काल सर्वाधिक पाऊस पडला. दुपारनंतर मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली असं वाटत असताना पुन्हा धो-धो पाऊस सुरु झाला. कालदेखील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आजदेखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानंतर आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महापालिकेकडून आवाहन (BMC)

भारतीय हवामान खात्याने (IMD) आज १९ ऑगस्ट २०२५रोजी मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट दिला आहे. दिवसभर मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई, उपनगरांमधील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

महापालिकेने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. जर काही काम असेल तरच घराबाहेर पडा असं महापालिकेने सांगितलं आहे. याचसोबत जर काही अडचण असेल तर महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ नंबरवर संपर्क साधावा. (School Closed Today)

School Holiday Today
Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

या ठिकाणी शाळा बंद (School Holiday Today Due to Rain In Mumbai)

आज मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातदेखील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे. याचसोबत महानगरांमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. रायगडमध्ये सर्वाधिक पाऊस पडत आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

School Holiday Today
Maharashtra Rain: राज्यात इतका धुव्वाधार पाऊस पडतोय कसा? पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com