Savitri Jindal Richest Billionaire Of India By Forbes @ForbesIndia
देश विदेश

Savitri Jindal | देशातल्या सर्वात श्रीमंत महीला बनल्या सावित्री जिंदल; Forbes च्या यादीनुसार आहे 'एवढी' संपत्ती

Savitri Jindal Richest Billionaire Of India By Forbes: सावित्री जिंदाल या देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आल्या आहेत आणि एकूण क्रमवारीत २० व्या क्रमांकावर आहेत.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: फोर्ब्सच्या (Forbes Billionaires 2022) जागतिक श्रीमंतांच्या यादीत जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल (Savitri Jindal Net Worth) या देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आल्या आहेत आणि एकूण क्रमवारीत २० व्या क्रमांकावर आहेत. जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती $१७.७ अब्ज आहे.

जिंदाल ग्रुप स्टील, पॉवर, सिमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आघाडीवर आहे. यामुळे अब्जाधीशांच्या यादीत जिंदाल समूह ९१ व्या स्थानावर आहे. 2020 मध्ये $4.8 बिलियन वरून 2022 मध्ये $17.7 बिलियनची वाढ झाली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत सावित्री जिंदाल यांचा समावेश टॉप 13 महिला अब्जाधीशांमध्ये झाला आहे. (The World's Billionaires)

हे देखील पाहा -

सावित्री जिंदाल यांना 9 मुले आहेत. 2005 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेले त्यांचे पती ओमप्रकाश जिंदाल यांनी या जिंदाल ग्रुपची स्थापना केली होती. तेव्हापासून हा समूह सावित्री जिंदाल चालवत आहे, ज्या कधीही शाळेत गेल्या नाहीत आणि आपल्या मेहनतीने तसेच समर्पणाने उंचीला स्पर्श करत आहे. केवळ दोन वर्षांत त्यांची एकूण संपत्ती सुमारे $12 अब्जांनी वाढली आहे. जिंदाल ग्रुप व्यवसायासोबतच राजकारणातही सक्रिय आहे.

सावित्री जिंदाल या हरियाणात भूपिंदर सिंग सरकारमध्ये मंत्री होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांचे पुत्र सज्जन जिंदाल हे JSW स्टील चालवतात आणि नवीन जिंदाल जिंदाल स्टील अँड पॉवर चालवतात. सावित्री जिंदाल व्यतिरिक्त, या यादीमध्ये Nykaa च्या संस्थापक फाल्गुनी नायर, फार्मा कंपनी USV Pvt Ltd च्या लीना तिवारी आणि किरण मुझुमदार शॉ यांच्यासह इतर भारतीय अब्जाधीश महिलांची नावे देखील आहेत. (Savitri Jindal Richest Billionaire Of India By Forbes)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT