Visa Free Travel Yandex
देश विदेश

Saudi Arabia: सौदी अरेबियाचा भारतासह १४ देशांना दणका! व्हिसावर घातली बंदी, कारण काय?

Saudi Arabia bans visas for 14 countries: सौदी अरेबियाचा मोठा निर्णय. भारतासह १४ देशांच्या व्हिसावर तात्पुरती बंदी. जूनपर्यंत प्रवेशबंदी कायम.

Bhagyashree Kamble

सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांना दणका दिला आहे. सौदी अरेबियाने १४ देशांच्या व्हिसावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. हे निर्बंध जूनपर्यंत कायम राहणार असून, ज्या लोकांकडे उमरा व्हिसा आहे, ते १३ एप्रिलपर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करू शकणार आहेत. हज यात्रेच्यावेळी गर्दी होत असल्याकारणाने ही बंदी घातली असल्याचं बोललं जात आहे.

जूनपर्यंत प्रवेशबंदी

सौदी अरेबियाने घातलेली स्थगिती ही जूनपर्यंत लागू करण्यात आली आहे. म्हणजेच हज यात्रा जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत ही बंदी उठवली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

सौदी अरेबिया सरकारचा ठोस निर्णय

योग्य नोंदणीशिवाय हजमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी सौदी अरेबिया सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सौदी अरेबिया सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मुख्य उद्देश, गेल्या वर्षीच्या हज दुर्घटनेची पुरावृत्ती रोखणे आहे.

सौदी अरेबिया सरकारनं हा निर्णय का घेतला?

गेल्या वर्षी मोठ्या संख्येनं चेंगराचेंगरी झाली होती. हज यात्रेला नोंदणी नसलेल्या यात्रेकरूंनी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तीव्र उष्णतेमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चेंगरीचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत किमान १, २०० यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर सौदी अरेबियाने आपले नियम कडक केले आहेत. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियातील क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी यावर्षी व्हिसा नियम कडक करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर ही बंदी घालण्यात आल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scholarship Exam 2025-26 : शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

Maharashtra Live News Update: वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात आली, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास

भाजप नेत्याच्या बेडरूमला आग, रॉकेट थेट बाल्कनीत घुसला; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं अन्..

Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळी पाडवानिमित्त व्यक्त करा आपले प्रेम! आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT