Nana Patole On Satya Pal Malik's allegations Pulwama Attack SAAM TV
देश विदेश

Nana Patole On Pulwama : पुलवामा हल्ल्यासंदर्भात सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, PM मोदींनी उत्तर द्यावे - नाना पटोले

Satya Pal Malik on Pulwama Attack: 'द वायर'ला दिलेल्या मुलाखातील सत्यपाल मलिक यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. विशेष म्हणजे पुलवामा हल्ला झाला त्यावेळी मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते.

Chandrakant Jagtap

Nana Patole On Satya Pal Malik's allegations Pulwama Attack : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपाचे वरिष्ठ नेते सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाला असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. तसेच या हल्ल्यानंतर मला पंतप्रधानांनी गप्प राहण्यास सांगितले होते गौप्यस्फोट देखील सत्यापाल मलिक यांनी केला आहे.

'द वायर'ला दिलेल्या मुलाखातील सत्यपाल मलिक यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. विशेष म्हणजे पुलवामा हल्ला झाला त्यावेळी मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. त्यामुळे तत्कालिन राज्यपालांच्या या दाव्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.

मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर आता विरोधकांकडून भाजपला सवाल केले जात आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, पुलमावामा हल्ल्याची घटना आणि ३०० कोटींच्या ऑफरचा आरोप अत्यंत गंभीर आहे. मलिक यांनी केलेले आरोप भ्रष्टाचार आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर सरकारची चूक लक्षात आणून देणाऱ्या मलिकांना मोदींनी गप्प राहण्यास सांगितले या मलिक यांच्या आरोपात अनेक अनुत्तरित प्रश्न दडले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आरोपांना उत्तर द्यावे असे नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, आरएसएसचे संघटन महासचिव राम माधव यांनी ३०० कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याचा आरोपही अत्यंत गंभीर आहे. ना खाऊंगा, ना खाने दूंगा म्हणाऱ्या मोदींच्या राज्यात ३०० कोटींची ऑफर राज्यपालांना दिली जाते, त्यावर भाजपाकडून एक शब्दही का काढला जात नाही. सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपामुळे पंतप्रधान मोदीभोवती संशयाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे भाजप आणि पंतप्रधान मोदींनी यावर खुलासा केला पाहिजे असेही ते म्हणाले.

भुजबळ यांची तपास करण्याची मागणी

दरम्यान सत्यपाल मलिक यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिला आहे. सत्यपाल मलिक हे तत्कालीन राज्यपाल होते, त्यामुळे त्यांना याची माहिती असेलच. त्यामुळे त्यांच्या आरोपांची शहनिशा केली पाहिजे. ज्या तपास यंत्रणा असतील त्यांनी त्याचा तपास केला पाहिजे असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)

मोदी सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवा -राऊत

मलिक यांच्या सरकारवरील आरोपांनंतर खासदार संजय राऊत म्हणाले की ''पुलवामा हल्ल्यात काहीतरी गडबड आणि घोटाळा आहे, हे आधीच देशाला माहित होतं. हे प्रश्न आम्ही वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला आहे की पुलवामात 150 किलो आरडीएक्स पोहोचाल कसं? पुलवामाच्या रस्त्याने कधीही सुरक्षाकर्मी कधीही प्रवास करत नाही. त्यांना एअर फोर्स किंवा सरकारने विमान का दिलं नाही? त्यांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याच राजकारण करावं अशी काही योजना होती का? असे सवाल संजय राऊत यांनी विचारले आहेत.

तसेच, "आज त्यांनीच नेमलेले तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तेच स्फोटक सत्य समोर आणलं आहे. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. तसेच जे मंत्री जबाबदार आहे, त्यांचं कोर्टमार्शल व्हायला हवं" अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकार कर्ज मुक्ती कधी करणार? उद्धव ठाकरेंचा शासनाला रोखठोक सवाल

Kidney Health: किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT