
New Delhi : पुलवामा हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाल्याचा गंभीर आरोप सत्यापाल मलिक यांनी केल्या देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणात गप्प राहण्यास सांगितल्याचंही सत्यपाल मलिक यांनी सांगितलं. 'द वायर'ला दिलेल्या मुलाखातील सत्यपाल मलिक यांना ही माहिती दिली. पुलवामा हल्ला झाला त्यावेळी मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते.
सीआरपीएफने जवानांना एअरलिफ्ट करण्याची मागणी केली होती. यासाठी गृह मंत्रालयाकडे पाच विमानांची मागणी करण्यात आली होती. मात्र सीआरपीएफला विामने देण्यासा सरकारने असमर्थता दर्शवली होती. जर त्यावेळी सीआरपीएफ जवानांना एअरलिफ्ट केलं असतं तर जवानांचे प्राण वाचले असते. तसेच जवानांना नेण्याच्या मार्गावरही पुरेशी सुरक्षा तपासणीही झाली नव्हती, असा दावा मलिक यांनी केला. (Latest News)
हल्ल्याच्या दिवशी पंतप्रधान जिम कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी माझ्याशी संवाद साधला. त्यावेळी मी जवानांच्या सुरक्षेतील त्रुटींची माहिती पंतप्रधान मोदींना दिली होती. मात्र त्यांनी मला गप्प राहण्यास सांगितलं.
याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही मला गप्प राहण्यास सांगितलं. त्यांना हल्ल्याचं खापर पाकिस्तानवर फोडायचं होतं आणि आगामी निवडणुकीत सरकार आणि भाजपला फायदा घ्यायचा होता, असा आरोपही मलिक यांनी केला.
मलिक म्हणाले की पुलवामा घटनेत गुप्तचर यंत्रणेतही मोठ्या त्रुटी आढळल्या आहेत. कारण 300 किलो आरडीएक्स घेऊन जाणारी कार पाकिस्तानातून आली होती. 10-15 दिवस जम्मू-काश्मीरच्या रस्त्यांवर आणि गावांमध्ये ही कार फिरत होती. मात्र सुरक्षा यंत्रणांना याची काहीही माहिती नव्हती. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.