Rahul Gandhi: राहुल गांधींनी सोडला सरकारी बंगला, आता 10 जनपथमध्ये आई सोनियांसोबत राहणार!

Latest Political News: दिल्लीतील 10 तुघलक लेन येथील राहुल गांधींचा सरकारी बंगला रिकामा करण्याचे काम सुरु आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi ANI News
Published On

Delhi News: मोदी आडनाव बदनामी प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या सुनावणीनंतर त्यांची खासदारकी रद्द करत २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला रिकामा करण्यात यावा अशी नोटीस पाठवण्यात आली होती.

या नोटीसीनंतर राहुल गांधींनी आपला सरकारी बंगला (Rahul Gandhi Residence) खाली केला आहे. शुक्रवारी सकाळपासून दिल्लीतील 10 तुघलक लेन येथील राहुल गांधींचा सरकारी बंगला रिकामा करण्याचे काम सुरु आहे.

Rahul Gandhi
US Dairy Farm Explosion: टेक्सासमध्ये डेअरी फार्ममध्ये मोठा स्फोट, 18 हजार गायींचा होरपळून मृत्यू!

मानहानीच्या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. 27 मार्च रोजी त्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीसही पाठवण्यात आली होती. या नोटीसमध्ये 22 एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. ही नोटीस मिळाल्यानंतर राहुल गांधींनी शुक्रवारी त्यांचा बंगला खाली केला. मोठ्या टेम्पोमध्ये सामान भरुन ते सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील घरी हलवले जात आहे. राहुल गांधी आता सोनिया गांधी यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

23 मार्च रोजी सुरत कोर्टाने मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, या प्रकरणात त्यांना अल्पावधीत जामीन मिळाला. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड येथून लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी कर्नाटक येथील एका रॅलीत 13 एप्रिल 2019 ला 'ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी यांचे नाव कॉमन का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का असतं?' असे वक्तव्य केलं होतं.

Rahul Gandhi
Amit Shah Rally : 2025 पूर्वीच देशातील आणखी एक सरकार कोसळणार; अमित शहांनी दिले संकेत

राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर सुनावणी करता सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. दरम्यान, काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. देशभरात काँग्रेस नेत्यांनी सत्याग्रह आंदोलन केले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी काळे कपडे घालून राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध देखील केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com