Political News  Saam TV
देश विदेश

Political News : सत्यपाल मलिकांना सीबीआयची नोटीस; अलिकडेच पुलवामा हल्ल्याबाबत व्यक्त केली होती शंका

Satya Pal Malik : भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशी करता त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Satya Pal Malik : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने नोटीस बजावली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करता त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे. (Political News)

सीबीआयने मला 27 किंवा 28 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील कथित विमा घोटाळ्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी दिल्ली कार्यालयात येण्यास सांगितलं आहे अशी माहिती, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्वत: दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमध्ये कथित अनियमिततेच्या मुद्दावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वीच सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुलवामा हल्ल्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. द वायर या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सत्यपाल मलिक यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि भ्रष्टाचार यावरून मोठे गौप्यस्फोट केले होते.

सीबीआयने सत्यपाल मलिक त्यांना इन्शुरन्स स्कॅमबाबत प्रश्नावली पाठवली आहे. 28 एप्रिलपर्यंत या प्रश्नांची उत्तरे देत चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. इन्शुरन्स स्कॅम रिलायन्स इन्शुरन्ससंदर्भात सीबीआयची ही चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धाराशिवहून मुंबई फक्त ५ तासात, महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, वाचा सविस्तर माहिती

Viral Video: बैलपोळा उत्सवात बैल उधळला; शेतकऱ्यांची पळापळ अन् पुढे काय घडलं ते पाहाच

Today Gold Rate: सोन्याचे दर १०,००० रुपयांनी वाढले; ग्राहकांच्या खिशाला फटका; १० तोळ्याचे भाव किती?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

गंगा स्नानाला जाताना काळाचा घाला, ट्रकने ऑटोला चिरडले, ८ जणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

SCROLL FOR NEXT