Senior BJP leader Saroj Prajapat, who passed away in Jaipur after health complications. Saam Tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे निधन! राजकीय वर्तुळात हळहळ

Senior BJP Leader Saroj Prajapat Death News Jaipur Hospital: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सरोज प्रजापत यांचे जयपूरमध्ये निधन झाले. गुडघ्याच्या ऑपरेशनदरम्यान प्रकृती बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Omkar Sonawane

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सरोज प्रजापत यांचे निधन झाले आहे. ते जयपूरच्या रुग्णालयात 3 दिवसांपासून वेंटीलेटरवर होत्या. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ते जयपूरच्या हॉस्पिटलमध्ये गुडघ्याचे ऑपरेशन करण्यासाठी अॅडमिट होत्या. मात्र शरीरातली साखर वाढल्याने त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना मंगलम हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. मात्र त्या ठिकाणी त्यांचे निधन झाले. निधनाचे वृत्त समजताच बहाजो कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

सरोज प्रजापती यांचे मूळ गांव डिडवाना होते. मात्र प्रजापत मागच्या दिवसांपासून आपल्या परिवारासोबत नागौरमध्ये राहत होत्या. त्यांचे पती राजेंद्र कुमार माजी सरकारी कर्मचारी आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुले आणि दोन मुलगी असा परिवार होता. 2019 साली त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. या घटनेमुळे भाजपमध्ये हळहळ व्यक्त होत असून पक्षातील अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

या घटनेमुळे भाजपमध्ये हळहळ व्यक्त होत असून पक्षातील अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भाजपचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या राजस्थान राज्य कार्यकारिणी समितीच्या सदस्या श्रीमती सरोज प्रजापत यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांचे निधन हे संघटनेचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांनी आपले जीवन लोकसेवा, संघटना आणि सामाजिक मूल्यांसाठी समर्पित केले होते.

मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबाला हे असह्य दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.

भावपूर्ण श्रद्धांजली.

ओम शांती शांती. असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gunaratna Sadavarte : जालन्यात मोठा गोंधळ; गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक

Shubman Gill: सूर्यानंतर गिलचंही वनडे कर्णधारपद जाणार? कोण घेणार प्रिन्सची जागा? या खेळाडूचं नाव चर्चेत

Nail Polish Health Risks: नेल पॉलिश लावल्याने वाढतो स्लो पॉयझनचा धोका? काय होतो शरीरावर परिणाम?

राज्यात चाललंय काय? घरात भाजी मागण्यासाठी आलेल्या मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार; पीडिता 4 महिन्यांची गरोदर

Maharashtra News Live Update: अशोक खरातला शिर्डीतील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT