Sanjay Raut  Saam Tv
देश विदेश

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Sanjay Raut On Modi Government: संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आणखी एक जण गायब असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यानंतर राजीव कुमार कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.

Priya More

Summary -

  1. संजय राऊत यांनी माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार बेपत्ता असल्याचा सवाल उपस्थित केला.

  2. याआधी त्यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या बेपत्ता असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

  3. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मदत केल्याचा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर आहे.

  4. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवल्यानंतर राऊत यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे.

वोटिंग चोरीच्या मुद्द्यावरून सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला टार्गेट केले जात आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा फोटो पोस्ट करत कुठे गायब झाले हे लोक? असा सवाल केला आहे. याआधी संजय राऊत यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे बेपत्ता असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती. आता त्यांनी राजीव कुमार कुठे आहेत असा सवाल केला आहे.

संजय राऊत यांनी पोस्टमध्ये असे लिहिले की, '२०२४ च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या गृहस्थाच्या महत्त्वपूर्ण मदतीने जिंकल्या. शिवसेना पक्ष आणि चिन्ह गद्दार गटाला देऊन त्यांनी पक्षांतराला प्रोत्साहन दिले आहे. राहुल गांधींनी आता निवडणूक आयोगाचा पक्षपात उघड केला आहे. पण ही व्यक्ती आता कुठं आहे? कोणी सांगू शकेल का? माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आधीच बेपत्ता आहेत, मग हे गृहस्थ आता नेमके कुठं आहेत?' असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, '२०२४ च्या निवडणुकीमध्ये राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते मी काल एक टीविट केले आहे. २०२४ साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्याने नरेंद्र मोदी निवडणुका जिंकू शकले ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत? जगदीश धनखड बेपत्ता झाले आहेत तसेच तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे.

तसंच, 'राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून खरं म्हणजे त्याचे उत्तर राजीव कुमार यांनी दिले पाहिजे. तेव्हा राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते. त्यांनी शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला गद्दारांना दिले. घटनेविरुद्ध जाऊन आणि त्यात किती कोटीचा व्यवहार झाला हे देखील मी सांगितलं. ते राजीव कुमार कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे. मी त्याच्यासंदर्भात सोशल मीडियावरती माझा प्रश्न टाकला आहे त्याच्यावर दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे जगदीप धनगडसुद्धा दिसत नाही आहेत.' , असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT