Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

election commission press conference August 17 : राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांनंतर निवडणूक आयोग उद्या रविवारी (१७ ऑगस्ट २०२५) पत्रकार परिषद घेणार आहे. आगामी निवडणुकांबाबत काही घोषणा होण्याची शक्यता असून, एसआयआर आणि मतचोरीच्या आरोपांवर आयोगाकडून उत्तरे दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, महत्वाच्या घोषणांसह मतचोरीच्या आरोपांना उत्तरे देण्याची शक्यता
election commission press conference August 17saam tv
Published On
Summary
  • निवडणूक आयोग उद्या (१७ ऑगस्ट) महत्वाची पत्रकार परिषद घेणार

  • राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर आयोग उत्तर देण्याची शक्यता

  • आगामी निवडणुकांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या रविवारी दुपारी तीन वाजता दिल्लीत महत्वाची पत्रकार परिषद होत आहे. निवडणूक आयोगाचे डायरेक्टर जनरल (मीडिया) यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकांसंबंधी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच एसआयआर आणि राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना उत्तरे देण्याची शक्यता आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या वतीने बिहारमध्ये 'व्होट अधिकार' यात्रा सुरू करण्यात येणार आहे. ६ दिवस ही यात्रा काढणार आहेत. १३०० किलोमीटरची ही यात्रा जवळपास २५ जिल्ह्यांतून जाणार आहे. या यात्रेत इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तेजस्वी यादव देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्याचवेळी निवडणूक आयोगाकडून उद्याच महत्वाची पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामुळे आयोगाच्या या पत्रकार परिषदेला महत्व प्राप्त झाले आहे.

मतचोरीच्या आरोपांना उत्तर?

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला होता. या आरोपांनंतर देशातलं राजकारण ढवळून निघालं होतं. आता या आरोपांना निवडणूक आयोग उत्तरे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मतदारयाद्यांमधील घोळ आणि मतचोरीचा आरोप करून निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, महत्वाच्या घोषणांसह मतचोरीच्या आरोपांना उत्तरे देण्याची शक्यता
Rahul Gandhi: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', व्हिडिओ पोस्ट करत लगावला निवडणूक आयोगाला टोला| Video Viral

मतचोरीच्या आरोपांचं सत्र सुरूच

गेल्या काही महिन्यांपासून, विशेषतः २०२४ मधील लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर विरोधी पक्षांनी मतदारयाद्यांमध्ये कथितरित्या घोळ झाल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ७ ऑगस्टला नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकातील बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचा हवाला देताना जवळपास एक लाखांहून अधिक मतांची चोरी झाल्याचा दावा केला होता.

मतदारयाद्यांमध्ये बोगस मतदार, बनावट पत्ते, एकाच पत्त्यावर शेकडो मतदारांची नावे अशा प्रकारचे अनेक आरोप करण्यात आले. जर हा घोळ झाला नसता तर कदाचित कर्नाटकात काँग्रेस १६ जागांवर विजयी झाला असता, असा दावा करण्यात आला.

निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, महत्वाच्या घोषणांसह मतचोरीच्या आरोपांना उत्तरे देण्याची शक्यता
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या जीवाला धोका, कोर्टात दिली खळबळजनक माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com