Rahul Gandhi: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', व्हिडिओ पोस्ट करत लगावला निवडणूक आयोगाला टोला| Video Viral

Rahul Gandhi Tea With Dead Voter: निवडणूक आयोगाने मृत घोषित केलेल्या मतदारांची राहुल गांधी यांनी भेट घेतली. बिहार निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील अनियमितता अधोरेखित करण्यासाठी एक व्हायरल व्हिडिओ शेअर केल्याने नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Tea With Dead Votesaamtv
Published On
Summary
  • राहुल गांधींनी मृत घोषित मतदारांसोबत चाय पे चर्चा केली.

  • निवडणूक आयोगावर मतदार याद्यांमध्ये गोंधळाचा आरोप.

  • बिहार निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांचे पुनर्परीक्षण सुरू.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी मतचोरीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाने तयार करण्यात आलेल्या यादीत ज्या मतदारांना मृत घोषित करण्यात आले होते, त्या लोकांसोबत राहुल गांधी चाय पे चर्चा केली. त्याचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत निवडणूक आयोगाला चिमटा काढलाय.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडणूक आयोगावर 'मत चोरी'चा गंभीर आरोप केलाय. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमध्ये संघर्ष सुरू झालाय. बिहार विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी तेथील मतदार याद्याचं पुनर्परीक्षण केलं जात आहे. आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय. अनेकांना मतदार याद्यांमध्ये मृत दाखवलंय. ज्या लोकांना मृत दाखवलंय त्या नागरिकांसोबत राहुल गांधींनी आज चाय पे चर्चा केली.

Rahul Gandhi
कुछ तो बडा होने वाला है! एनडीएमधील बडा नेता राहुल गांधींच्या संपर्कात

आता राहुल गांधी यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी अशा लोकांची भेट घेतली. ज्यांची नावेच मतदार यादीत नाहीत. हे लोक म्हणतात की, आम्ही तपासणी केली तेव्हा आम्हाला कळलं की, आम्ही मृत आहोत. त्यावर राहुल गांधी म्हणतात, 'निवडणूक आयोगाने तुम्हाला मारले तर. राहुल गांधी काही लोकांना भेटून म्हणतात की, 'मी ऐकले की, तुम्ही लोक जिवंत नाहीत? तुम्हाला मृत घोषित केलंय.

Rahul Gandhi
Rahul Gandhi: पिक्चर अभी बाकी है, व्होट चोरीवरुन गांधींचा भाजपला इशारा, गांधींच्या प्लॅनने वाढवलं भाजपचं टेन्शन?

आपण मृत आहोत, हे तुम्हाला कसं कळलं?' त्यावर उपस्थितांपैकी एक व्यक्ती म्हणतो, 'आम्ही मतदार यादी तपासली, त्यात आमचे नाव नव्हतं. त्यानंतर आम्हाला समजले की, कागदावर आम्हाला मृत घोषित केलंय.' त्यावर राहुल म्हणतात, 'निवडणूक आयोगाने तुम्हाला मारले आहे.' 'मृत घोषित झालेले किती लोक आहेत? असा प्रश्न राहुल गांधींनी त्यांना केला. त्यावर एक व्यक्ती सांगतो, 'एका पंचायतीत किमान ५० लोक मृत आहेत. राहुल गांधींना भेटण्यासाठी आलेले हे लोक राघोपूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. ते तेजस्वी यादव यांचा विधानसभा मतदारसंघ आहे.

कागदोपत्री मृत झालेल्या काही लोकांची भेट घेतल्यानंतर या भेटीचा व्हिडिओ राहुल गांधींना व्हिडिओ पोस्ट केलाय. व्हिडिओला त्यांनी कॅप्शन देत निवडणूक आयोगाला टोला मारलाय. 'आयुष्यात अनेक मनोरंजक अनुभव आलेत, परंतु 'मृत लोकां'सोबत चहा पिण्याची संधी कधी मिळाली नाही. या अनोख्या अनुभवाबद्दल निवडणूक आयोगाचे आभार.' असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला चिमटा काढलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com