Sam Altman yandex
देश विदेश

OpenAIमधून हकालपट्टी झाल्यानंतर सॅम ऑल्टमनची Microsoftमध्ये एंट्री; सत्या नडेला यांचं ट्विट

Sam Altman : एक वर्षांपूर्वी ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी चॅटजीपीटी जगासमोर आणलं होतं.

Bharat Jadhav

Sam Altman in Microsoft:

ओपन एआयमधून हकालपट्टी झाल्यानंतर सॅम ऑल्टमनची मायक्रोसॉफ्टमध्ये एंट्री झालीय. ऑल्टमनबरोबर ग्रेग ब्रॉकमनची सुद्धा मायक्रोसॉफ्टमध्ये एंट्री झालीय. या विषयीची माहिती मायक्रोसॉफ्टचे प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नडेला यांनी 'एक्स' या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहित दिलीय.(Latest News)

सत्या नडेलाने यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' वर पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी या दोघांच्या एंट्रीविषयी माहिती दिलीय. दरम्यान एक वर्षांपूर्वी ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी चॅटजीपीटी जगासमोर आणलं होतं. सॅम ऑल्टमने अभूतपूर्व क्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या चॅटबॉटचा अविष्कार केला होता. एका सेकंदात कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यावर मिळत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक क्रांती घडून आली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

का झाली हकालपट्टी

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीमध्ये ऑल्टमनच्या या अविष्कारामुळे अनेक कंपन्यांमधील लोकांचं टेन्शन वाढलं होतं. नवीन क्रांती घडवणाऱ्या ऑल्टमन हे नेतृत्व करण्यास सक्षण नसल्याचं कारण देत कंपनीने त्यांची हकालपट्टी केली होती. सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी केल्यानंतर ओपनएआय बोर्डाने एक निवेदन जारी करत यासंदर्भात खुलासा केला होता.

या निवदेनात त्यांनी हा निर्णय का घेतला याचं कारण दिलं. ऑल्टमन यांना बडतर्फ करण्याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. ऑल्टमन यांना त्यांच्या कामाबाबत स्पष्टता नव्हती. यातून जबाबदारी पार पाडण्यात त्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे ओपनएआयचे नेतृत्व ते सक्षम आहेत असं बोर्डाला वाटत नसल्याचं या निवदेनात म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मत मोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT