Sadichha Sane case Saam TV
देश विदेश

Sadichha Sane case: सदिच्छा साने मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा; पोलिसांच्या हाती लागली ‘फ्लोट ट्यूब’

पालकांकडे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पत्र लिहून त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांची मागणी केली आहे.

सुरज सावंत

Sadichha Sane case: जे.जे.रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सदिच्छा सानेच्या मृत्यूप्रकरणी आता नवनवीन खुलासे होत आहे. तपास करणाऱ्या पोलिसांना आरोपीकडील फ्लोट ट्यूबवर रक्त सापडले असून त्याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. (Latest Sadichha Sane News)

त्यासाठी रविवारी सानेच्या पालकांकडे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पत्र लिहून त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांची मागणी केली आहे.

सदिच्छा साने ही पालघर येथील रहिवासी होती. तसेच ती जे. जे. ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली, ती परतलीच नाही.

या घटनेत मिळालेल्या माहितीनुसार, मिथू सिंह आणि सदिच्छा यांच्यात अचानक वाद झाला. सदिच्छाने माझ्या वागण्याबाबत आक्षेप घेत भांडण केले. त्यावेळी तिला मागे ढकलले असता तिचे डोकं दगडाला आदळलं. त्यामुळे झटापटीत तिचा मृत्यू झाला, असं आरोपी मिथू सिंह याने म्हटलं होतं.

तिला ठार मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असा दावा देखील मिथू याने चौकशीत कोला होता. सदिच्छाचा मृतदेह ‘फ्लोट ट्युब’वर ठेऊन पाण्यात नेला, असेही त्याने सांगितले होते. त्यावर एका वर्षानंतरही रक्ताचे नमुने सापडले आहेत.

त्यामुळे आता पोलीस त्याबाबत डीएनए चाचणी करणार आहेत. त्यासाठी सदिच्छा सानेच्या कुटुंबियांना पत्र लिहून रक्ताच्या नमुन्यांची मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

How to Peel Garlic: आता काही सेकंदात सोलून होईल लसूण; फक्त फॉलो करा या 3 टीप्स

SCROLL FOR NEXT