Shreya Maskar
टॉयलेट पेपरचा वापर अनेक जण शौचानंतर स्वच्छतेसाठी करतात. तो सोयीस्कर असला, तरी त्याचा अतिवापर, खडबडीत पोत, सुगंधी घटक किंवा चुकीच्या पद्धतीने पुसण्याची सवय यामुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो.
सुगंधी किंवा रंगीत टॉयलेट पेपरमध्ये असलेले काही घटक संवेदनशील त्वचेला हानी पोहचवतात. खडबडीत पेपरने वारंवार घासल्यास त्वचेवर घर्षण होऊन जळजळ वाढू शकते. त्वचा लाल होते. त्यामुळे सुगंधरहित, मऊ आणि साधा पांढरा टॉयलेट पेपर वापरा.
वारंवार जोरात पुसण्यामुळे प्रायव्हेट पार्टची नाजूक त्वचा घासली जाऊ शकते. यामुळे त्वचेवर सूक्ष्म जखमा, दुखणे आणि जळजळ होऊ शकते. त्यामुळे वारंवार घासणे टाळा. पाण्याने हलके स्वच्छ करून भाग कोरडा ठेवा.
आधीच मूळव्याध असल्यास खडबडीत पेपरने जोरात पुसल्यामुळे वेदना, खाज किंवा जळजळ वाढू शकते.जोरात घासण्याऐवजी कोमट किंवा साध्या पाण्याने हलके स्वच्छ करा आणि मऊ टॉवेलने थोपटून कोरडे करा. शौचाच्या वेळी रक्त दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हँडहेल्ड बिडेट स्प्रेचा वापर करा. कोमट पाण्याने प्रायव्हेट पार्ट हलक्या हाताने स्वच्छ करता येतो. पाण्याचा दाब सौम्य ठेवा आणि स्वच्छतेनंतर भाग कोरड्या कपड्याने पुसा.
बिडेट स्प्रे उपलब्ध नसल्यास स्वच्छ भांड्यातील पाण्याने स्वच्छता करता येते. प्रत्येक वेळी स्वच्छ पाणी वापरा आणि भांडे स्वच्छ ठेवा.
टॉयलेट पेपर मऊ असावा, सुगंधरहित पेपर निवडा, रंग आणि अनावश्यक घटक टाळा, ओलावा शोषून घेण्याची क्षमता चांगली असावी, त्वचेला त्रास होत नाही ना, हे पाहा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.