Banana-Blood Pressure : रोज केळी खाल्ल्यानं खरंच हाय ब्लड प्रेशर होतं कंट्रोल? 'या' चुका टाळा, नाहीतर...

Shreya Maskar

केळी-हाय बीपी

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र त्यांचे प्रमाण मर्यादित असावे.

Bananas and High BP | Pinterest

केळ्याचे पोषक घटक

केळ्यामध्ये पोटॅशियम हे महत्त्वाचे खनिज असते. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे संतुलन राखण्यास आणि रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यास मदत करते.

Nutrients in Bananas | Pinterest

कधी केळी खावीत?

दररोज एक मध्यम आकाराचे केळे खाऊ शकतात. बीपीच्या रुग्णांनी पिकलेली केळी खाणे अधिक फायदेशीर असते. सकाळी नाश्त्यासोबत किंवा मधल्या वेळेत केळे खाऊ शकता.

eat bananas | Pinterest

गरजेपेक्षा जास्त केळी खाणे टाळा

केळी पौष्टिक असली तरी केवळ रक्तदाब कमी करण्यासाठी वारंवार, जास्त प्रमाणात खाण्याची गरज नाही. संतुलित आहारात आपल्या गरजेनुसार केळीचा समावेश करा.

Avoid overconsumption | Pinterest

किडनी

किडनीचा आजार असलेल्या व्यक्तीने केळी खाताना विशेष काळजी घ्यावी. किडनीची कार्यक्षमता कमी असल्यास रक्तातील पोटॅशियम वाढू शकते. अशा वेळी केळ्याचे प्रमाण डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवा.

Kidney Health | Pinterest

खबरदारी

केळ्यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. मात्र, मीठ कमी खाणे, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

Precautions | Pinterest

केळीचे इतर फायदे

पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, शरीराला ऊर्जा मिळते, मेंदू आणि मज्जासंस्थेला पोषण देते, पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

bananas | Pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Pinterest

NEXT : दोन मजले चढताच दम लागतो, दुर्लक्ष करू नका; हार्ट अटॅकचा तर संकेत नाही ना?

Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...