Heart Attack : दोन मजले चढताच दम लागतो, दुर्लक्ष करू नका; हार्ट अटॅकचा तर संकेत नाही ना?

Shreya Maskar

जिने चढताना धाप लागणे

जिने चढताना, थोडे चालल्यानंतरही श्वास फुलत असेल, तर अनेकांना थकवा आणि फिटनेसची कमतरता असल्याचे वाचते. मात्र, काही वेळा जिने चढताना धाप लागणे हे हृदय किंवा फुफ्फुसांशी संबंधित समस्येचे लक्षणही असू शकते.

Getting winded while climbing stairs | pinterest

हृदयाशी संबंधित समस्या

हृदय शरीराच्या सर्व भागांना रक्त आणि ऑक्सिजन पुरवते. हृदयाची पंप करण्याची क्षमता कमी झाल्यास किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असल्यास शारीरिक श्रम करताना धाप लागू शकते. हृदयाचे ठोके अनियमित होतात.

Heart-related issues | pinterest

फुफ्फुसांचे आजार

दमा, दीर्घकालीन फुफ्फुसांचे आजार, श्वसनमार्गातील संसर्ग यांमुळेही श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. धाप लागण्यासोबत खोकला, घरघर किंवा छातीत जडपणा जाणवत असल्यास तपासणी करा.

Lung diseases | pinterest

हिमोग्लोबिन कमी होणे

रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळण्यात अडचण येऊ शकते. यामुळे जिने चढताना धाप लागणे, थकवा जाणवणे, अशक्तपणा आणि चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Low hemoglobin | pinterest

वजन जास्त

शरीराचे वजन जास्त असल्यास किंवा नियमित व्यायामाची सवय नसल्यास जिने चढताना हृदय आणि श्वसनसंस्थेवर अधिक ताण येऊ शकतो.

Excess weight | pinterest

'ही' घ्या खबरदारी

धाप अचानक आणि तीव्र स्वरूपात लागणे, छातीत दुखणे, दडपण जाणवणे, बेशुद्ध पडणे, ओठ निळसर होणे, बोलताही येणार नाही इतकी धाप लागणे, अशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

Take These Precautions | pinterest

उपाय काय?

नियमित चालण्याची सवय लावा. वजन जास्त असल्यास ते नियंत्रणात ठेवा. धूम्रपान टाळा. वेळच्या वेळी विश्रांती घ्या.

What Can You Do? | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : छातीत दुखत नसतानाही येऊ शकतो हार्ट अटॅक; 'ही' ७ लक्षणे फक्त महिलांमध्येच दिसतात

Women Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...