Shocking News Saam Tv
देश विदेश

Shocking News: नवऱ्याच्या मृतदेहासोबत महिलेचा ट्रेनमधून १३ तास प्रवास, तरीही कळले नाही; साबरमती एक्सप्रेसमधील प्रकार

Sabarmati Express: अहमदाबादहून अयोध्येला जाणाऱ्या साबरमती एक्सप्रेसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. साबरमती एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल १३ तास ट्रेनमध्येच होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sabarmati Express Shocking News:

अहमदाबादहून अयोध्येला जाणाऱ्या साबरमती एक्सप्रेसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. साबरमती एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल १३ तास ट्रेनमध्येच होता. १३ तासानंतर मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेने ट्रेनमधील प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र पतीचा मृत्यू झालाय हे सोबत असलेल्या पत्नीला देखील कळाले नाही. (Shocking News)

राजकुमार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राजकुमार आपली पत्नी, मुले आणि एका मित्रासोबत सुरहतून अयोद्धेला जात होता. या प्रवासादरम्यान तो झोपी गेला. बराच वेळ राजकुमार उठला नसल्याने ट्रेनमधील प्रवाशांना संशय आला. यावेळी राजकुमारचा मृत्यू झाल्याचे लक्षात आहे. तब्बल १३ तास राजकुमारचा मृतदेह ट्रेनमध्ये होता. ट्रेन झाशी रेल्वे स्थानकावर आल्यावर मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जीआरपीने मृतदेह ताब्यात घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार हा अयोद्धेतील इनायत नगर येथील मजलाई गावचा रहिवासी होता. तो सुरतहून अयोद्धेला जाणाऱ्या साबरमती एक्सप्रेसने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान राजकुमार झोपला होता. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास राजकुमारला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो उठला नाही. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले, असं राजकुमारचा मित्र सुरेशने सांगितलं.

राजकुमारची बायको आणि मुलांना पतीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यास त्यांना मोठा धक्का बसेल. त्यामुळे त्यांना प्रवासादरम्यान काहीच सांगितले नाही. रात्री ८ वाजता ट्रेन झांसीच्या विरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनवर पोहचल्यावर त्यांना याबाबत माहिती दिली, असं सुरेशने सांगितलं.

याबाबत राजकुमारची बायकोने सांगितले की, मी त्यांना सकाळी ८ वाजता उठवण्याचा प्रयत्न केला. पण ते काही उठले नाही. शरीर गरम असल्याने त्यांना काहीही समजले नाही. ते नेहमीसारखेच झोपले असल्याचे आम्हाला वाटले.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार सुरतमध्ये गाडी चालवायचा. त्याचा एकदा अपघात झाला होता. त्यामुळे तो आजारी होता. त्याच्या औषधोपचारासाठी त्याला फैजाबादला घेऊन जात होते. त्याचदरम्यान तयांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT