S.Jaishankar Statement ANI
देश विदेश

US Deportation : यात काही नवं नाही; अमेरिकेतून भारतीयांना काढल्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांची प्रतिक्रिया

Indians Deportation From Us : काल अमेरिकेन स्थलांतरीत भारतीयांना मायदेशात परत पाठवले. या प्रकरणावर राज्यसभेत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

104 Indian immigrants deported from US : काल अमेरिकेतून भारतीय स्थलांतरीत नागरिकांना विशेष लष्करी विमानाने भारतामध्ये सोडण्यात आले. दुपारच्या सुमारास विमान सी-१७ (प्लाइट क्रमांक आरसीएम १७५) अमृतसरमध्ये उतरले. यात ७९ पुरुष, २५ महिलांसह १३ मुलांचा समावेश होता. स्थलांतरीतांना भारतात पाठवण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेवर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

१०४ स्थलांतरीत भारतीय अमेरिकेहून मायदेशात परतले. आज राज्यसभेमध्ये एस. जयशंकर यांनी या घटनेवर भाष्य केले. ते म्हणाले, 'आपले नागरिक दुसऱ्या देशात बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्यास त्यांना परत आणणे ही सर्व देशांची जबाबदारी आहे. ही डिपोर्टेशनची प्रक्रिया काही नवी नाही. आम्ही स्थलांतरीत नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी केली आहे. हा नवा मुद्दा आहे असे समजू नये. यापूर्वीही असे घडले आहे.'

'अमेरिकेकडून डिपोर्टेशनचे काम इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंटद्वारे (ICE) केले जाते. आयसीई ज्या एसओपीवर काम करते ते २०१२ पासून प्रभावी आहे. आम्ही अमेरिकन सरकारशी या प्रकरणावर चर्चा सुरु आहे. परत आलेल्या स्थलांतरीतांची कोणत्याही प्रकारची गैरवर्तवणूक होणार नाही याची काळजी घेतली जात आहे,' असे जयशंकर म्हणाले.

परराष्ट्र मंत्रालयाने २००९ ते २०२५ पर्यंत भारतात परत पाठवलेल्या स्थलांतरीत नागरिकांची आकडीवारीनुसार माहिती दिली. यानुसार २००९ मध्ये ७३४, २०१० मध्ये ७९९, २०११ मध्ये ५९७, २०१२ मध्ये ५३०, २०१४ मध्ये ५९१, २०१५ मध्ये ७०८, २०१७ मध्ये १३०३, २०१८ मध्ये ११८०, २०१९ मध्ये २०४२, २०२० मध्ये १८८९, २०२१ मध्ये ८०५, २०२२ मध्ये ८६२, २०२३ मध्ये ६७०, २०२४ मध्ये १३६८ आणि २०२५ मध्ये १०४ स्थलांतरीतांना डिपोर्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Denver Airport Incident : १७३ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरला आग, अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली | Video

Kharadi Rave Party : मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटक

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

स्प्रे मारून बेशुद्ध, शेतात नेत अत्याचार अन् बांधून टाकलं; बीडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य | Beed News

Sabudana Laddu Recipe: श्रावणात उपवासाला झटपट बनवा 'साबुदाणा लाडू', ही रेसिपी एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT