Air Force Plane Crash: हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं; अपघातानंतर लागलेल्या आगीत झाला कोळसा, Video

Air Force Plane Crash In Shivpuri : मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडलीय. विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत.
 Air Force Plane Crash
Air Force Plane Crash In Shivpuri :ANI
Published On

मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे हवाई दलाचे लढाऊ विमान शेतात कोसळल्याची घटना घडलीय. यात विमान पूर्ण जळून खाक झाले आहे. सुदैवाने लढाऊ विमानातील दोन्ही पायलट पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमान अपघाताची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.

अपघात कसा झाला?

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, वायुसेनेचे मिराज २००० हे लढाऊ विमान गुरुवारी दुपारी 2:20 च्या सुमारास कोसळले. हे विमान शिवपुरीच्या करैरा तहसीलच्या सुनारी पोलीस स्टेशन परिसरात विमान कोसळलं. बहरेटा सानी गावाजवळील एका शेतात लढाऊ विमान कोसळलंय. धुराचे लोट दिसताच गावातील लोक घटनास्थळाकडे धावू लागले. काही वेळातच ग्रामस्थांचा जमाव घटनास्थळी जमा झाला.

संरक्षण अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, हे विमान नियमित प्रशिक्षण उड्डाण करत असताना हा अपघात झालाय. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आलेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिराज २००० या विमान कोसळलं असून त्यातील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळावर एक बचाव पथक पाठवलंय. तसेच पोलीस देखील तेथे पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com