Alexei Navalny  Saam Digital
देश विदेश

Alexei Navalny : पुतीन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू; कोण आहेत पुतीन सरकारला जेरीस आणणारे नवाल्नी? जाणून घ्या

Alexei Navalny Suspicious Death: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक क्रेमलिनच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे अलेक्सी नवाल्नी (वय ४७) यांचा मृत्यू झाल्याचे रशियाच्या तुरुंग प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले.

Sandeep Gawade

Alexei Navalny

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक क्रेमलिनच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे अलेक्सी नवाल्नी (वय ४७) यांचा मृत्यू झाल्याचे रशियाच्या तुरुंग प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. दरम्यान त्यांची राजकीय द्वेषातून हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पुतीन यांच्या सरकारवर संशयाचे ढग दाटले आहेत. आज दुपारी तुरुंगातच चालताना त्यांची शुद्ध हरपली आणि कोसळल्याने मृत्यू झाल्याचे तुरुंग अधिकाऱ्याने म्हटले आहे.

अलेक्सी नवाल्नी यांनी २०१० मध्ये क्रेमलिनच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व केले हेाते आणि फसवणूक आणि बंडखोरीच्या आरेापाखाली तीस वर्षाची शिक्षा भोगत होते. ते अनेक काळापासून आर्टिक सर्कलच्या उत्तरेकडील सुमारे ४० मैल अंतरावरच्या पेनल कॉलनीतील तुरुंगात होते. अलेक्सी नवाल्नी हे प्रामुख्याने अध्यक्ष पुतीन यांचे विरोधक मानले जातात. ते वकील होते. त्यांनी पुतीन यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध व्यापक मोहीम हाती घेतली होती.

यामालो नेनट्स स्वायत्त जिल्ह्यातील फेडरल पेनिटेन्ट्री सर्व्हिसने निवेदन जारी केले असून त्यात म्हटले, खार्प येथील आयके-३ पेनल कॉलनी तुरुंगात फिरत असताना अचानक नवाल्नी यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते जागीच कोसळले. त्यांची शुद्ध हरपली. नवाल्नी यांना चक्कर आल्याचे कळताच वैद्यकीय पथक तातडीने दाखल झाले आणि रुग्णवाहिकेलाही पाचारण केले. त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झाल्याची घोषणा रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी केली. मृत्यूचे कारण अद्याप निश्‍चित व्हायचे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

पुतीन यांना नवाल्नी यांच्या मृत्यूची माहिती दिल्याचे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले. २०२१ मध्ये जर्मनीतून स्वच्छेने परतलेले नवाल्नी यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे रशियात कौतुक झाले. यादरम्यान, त्यांच्यावर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला. सर्बिया येथे ऑगस्ट २०२० मध्ये विषप्रयोग झाल्याचा गौप्यस्फोट स्वत: नवाल्नी यांनी केला होता. मात्र क्रेमलिन यांनी नवाल्नी यांचे आरोप फेटाळून लावले होते. याबाबत कोणतेही पुरावे सादर झाले नव्हते, असे क्रेमलिनने म्हटले होते. नवाल्नी यांच्या वकिलाने म्हटले, बुधवारी आपण नवाल्नी यांना भेटलो होतो. त्यावेळी सर्वकाही ठिक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

SCROLL FOR NEXT