India Mediate Peace in Russia-Ukraine War Saamtv
देश विदेश

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

India Mediate Peace in Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील शांतता प्रस्थापित करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पुतिन आणि झेलेन्स्की भारताला भेट देण्याची अपेक्षा असल्याने, भारताच्या जागतिक राजनैतिक प्रभावाबद्दल अटकळ बांधली जात आहेत.

Bharat Jadhav

  • पुतिन आणि झेलेन्स्की भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती.

  • रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेसाठी भारत मध्यस्थी करू शकतो.

  • अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यामुळे राजनैतिक घडामोडींना गती.

  • भारताची जागतिक पातळीवरील कूटनीती व शांततेतील भूमिका ठळक होणार.

रशिया आणि युक्रेन युद्धाचा संबंध जोडत अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, भारत रशियाकडून सतत तेल खरेदी करत असल्याने त्यामुळे रशियाला आर्थिक मदत आहे. त्यामुळे भारतावर टॅरिफ लावण्यात आला. अलीकडेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींनी फोन करून अमेरिका दौऱ्याची माहिती दिली होती.

आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे आज युक्रेनचे भारतातील राजदूत अलेक्झांडर पोलिशचुक यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीही भारत दौऱ्यावर येणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर रशियासोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी भारताने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी असे आवाहन युक्रेन मार्फत त्यांनी केलंय. युक्रेनच्या राष्ट्रीय ध्वज दिनानिमित्त बोलताना पोलिशचुक म्हणाले की, २०२३ पासून युक्रेन आणि भारत यांच्यातील संवादात वाढ झाली असून ते स्वागतार्ह आहे.

भारत युद्धात तटस्थ नाही या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचेही त्यांनी कौतुक केले. तसेच भारत शांतता, मुत्सद्देगिरी आणि राजकीय संवादाचे जोरदार समर्थन करत असल्याचे ते म्हणालेत. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) अधिवेशनात दोन्ही देशांमधील हा संवाद सुरू राहील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीच्या भारत भेटीबद्दल विचारले असता राजदूत पोलिशचुक म्हणाले, हो, झेलेन्स्की लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. 'दोन्ही देश भेटीची तारीख आणि चर्चेचा विषय अंतिम करण्यात व्यस्त आहेत. लवकरच त्याची घोषणा केली जाईल.' युक्रेनियन राजदूतांनी 'द वीक' मध्ये भारत-युक्रेन संबंधांवर चर्चा करणारा एक लेख लिहिलाय. यात त्यांनी लिहिले आहे की, "युक्रेनच्या तीन राष्ट्रपतींनी भारताला अधिकृत भेट दिली, तर भारताच्या दोन राष्ट्रपतींनी युक्रेनला भेट दिलीय. २०२१ पर्यंत म्हणजेच रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी द्विपक्षीय व्यापार सुमारे $३.४ अब्जपर्यंत पोहोचला होता.

''दीर्घकाळानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान यांच्यात पहिली बैठक नोव्हेंबर २०२१ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या हवामान शिखर परिषदेदरम्यान झाली.'' मे २०२३ पासून अशा बैठका आणि दूरध्वनी संभाषणे नियमित झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या ऐतिहासिक युक्रेन दौऱ्याने द्विपक्षीय संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू केला.

यामुळे दोन्ही लोकशाही देशांच्या नेत्यांच्या धोरणात्मक भागीदारीकडे वाटचाल करण्याच्या आकांक्षेला पुन्हा एकदा पुष्टी मिळाली. आज, दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्रालय आणि राजनैतिक मिशन हे सामायिक उद्दिष्ट अंमलात आणण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या आगामी भारत भेटीदरम्यान धोरणात्मक भागीदारीसाठी एक रोडमॅप स्वाक्षरी होऊ शकते,असं राजदूतांनी म्हटलंय.

राजदूतांनी सांगितले की, "युक्रेनमधील शांतता निर्माण प्रक्रियेत भारताचा अधिक सहभाग अपेक्षित आहे. मला विश्वास आहे की आमच्या सर्व बैठका युक्रेनमधील शांतता प्रश्न कसा सोडवायचा यावरील चर्चेचा भाग असतील." भारत रशियाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राजकीय संवाद कसा साधू शकतो. विशेषतः रशिया आणि भारत यांच्यातील दीर्घकालीन संबंध लक्षात घेता, आम्हाला हे अपेक्षित असल्याचं युक्रेनच्या राजदूतांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPCIL Recruitment: NPCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार ५६,१०० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंविरोधात कारवाई होणार?, कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी तिसऱ्यांदा नोटीस

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव आयोगाची कारणे दाखवा नोटीस

US Work Permit Rules : अमेरिकेच्या निर्णयाचा होणार परिणाम, भारतीयांच्या नोकरीवर टांगती तलवार? | VIDEO

डिजिटल होम अरेस्टच्या नावाखाली फसवलं, १ कोटी लुबाडले, पुण्यातील वृद्धाचा हृदयविकारानं मृत्यू

SCROLL FOR NEXT