Weak Rupee Could Impact Economy saam
देश विदेश

महागाईची झळ बसणार! सोनं उच्चांक गाठणार, पेट्रोल - डिझेलच्या किमती वाढणार; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Weak Rupee Could Impact Economy: डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत घसरली. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीची शक्यता. सोनं - चांदीही महागणार.

Bhagyashree Kamble

सोनं अन् चांदीच्या दरांसोबत आता पेट्रोल अन् डिझेलच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याला कारण ढासळणारा रूपया ठरू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. डॉलरच्या तुलने भारतीय रूपयाची किंमत ९० कडे पोहचली आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पडू शकतो. पुढील काही दिवसांत सोन्याची किंमत प्रति तोळा दीड लाखांकडे जाऊ शकते. तर चांदीलाही चकाकी येण्याची शक्यता आहे. त्यातच आता पेट्रोल डिझेल वाढल्यास दैनंदिन वस्तूंच्या किंमतीतही वाढ होऊ शकते, असा अंदाज अर्थविश्लेषक सुनील टाकळकर यांनी सरकारनामाला सांगितले. पेट्रोल, डिझेलच्या किंमती, सोन्या-चांदीला झळाळी अन् देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा परिणाम यावर त्यांनी सरकारनामामध्ये स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केलंय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय, हे थोडक्यात जाणून घेऊय़ात..

महागाईचा चटका बसणार

डॉलरची किंमत जास्त आणि रूपयाचा दर घसरल्यामुळे आयात होणाऱ्या प्रत्येक वस्तूंची किंमत वाढते. हा वाढलेला खर्च कंपन्या थेट ग्राहकांवर टाकतात. याचा थेट फटका ग्राहकांच्या खिशाला बसतो. यामुळे डॉलरमध्ये घेतलेले कर्ज रूपयांमध्ये फेडताना महाग होते. परिणामी कंपन्यांवर कर्जाचा बोजा वाढतो.

पेट्रोल डिझेल महागणार

भारत कच्चे म्हणजे खनिज तेल डॉलरमध्ये खरेदी करतो. डॉलरची किंमत वाढल्याने प्रत्येक बॅलरमागे रूपयांमध्ये अधिक किंमत मोजावी लागेल. परिणामी पेट्रोलियम कंपन्या हा वाढलेला खर्च थेट ग्राहकांवर टाकतील. यामुळे पेट्रोल - डिझेल तसेच स्वंयपाकघरात वापरण्यात येणाऱ्या गॅसच्या किंमतीत वाढ होईल. दरम्यान, रूपयाच्या घसरणीमुळे आयात करणाऱ्या कंपन्यांना आणि सर्वसामान्यांना अधिक नुकसान सोसावे लागेल.

सोनं महागणार

दिवाळीनंतर सोन्याच्या भावाचा आलेख चढताच राहिला आहे. दरम्यान, डॉलर महाग झाल्याचा परिणाम सोन्यावर देखील होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत डॉलरमध्ये ठरते. १००० डॉवर प्रति औंस सोने (साधारण ३१. १ ग्रॅम) आयात करण्यासाठी जेव्हा विनिमय दर ८० असतो, तेव्हा ८० हजार रूपये लागतात. जेव्हा विनिमय दर ९० होतो, तेव्हा ९० हजार रूपये मोजावे लागतात. परिणामी रूपये घसरल्याने भारतात सोन्याचे वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

Valentine Day Love Letter: 'प्रेम हे फक्त प्रेम असतं, पहिलं-दुसरं असं काही नसतं'

Today Panchang: आजचे पंचांग आणि राशीसंकेत: शुक्रवार कोणासाठी ठरणार फायदेशीर?

SCROLL FOR NEXT