benjamin netanyahu Saam tv
देश विदेश

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झाला आहे का? इस्त्रायलच्या राजदूतांनी सगळंच सांगितलं

benjamin netanyahu : पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली आहे. यावर इस्त्रायलच्या राजदूतांनी भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवा

नेतन्याहू यांनी स्वतःचा कॅफेमधील व्हिडिओ केला शेअर

भारतातील इस्रायलचे राजदूत रेउवेन अजार यांनी केला नेतन्याहू जिवंत असल्याचं दावा

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. नेतन्याहू हे वास्तवात जिवंत नसून त्यांच्या एआय व्हिडिओचा वापर करण्यात येत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या अफवांदरम्यान इस्त्रायलच्या राजदूतांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. तर नेतन्याहू यांनी स्वत:चे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नेतन्याहू हे जेरुसलमच्या एका कॅफेमध्ये कॉफी पिताना दिसत आहेत. ते व्हिडिओमध्ये हसत हसत बोलताना दिसत आहेत. नेतन्याहू हे दोन्ही हात वर करत संवाद साधताना दिसत आहेत. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना पूर्णविराम मिळावा, यासाठी त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला.

इस्त्रायलच्या राजदूतांनी काय सांगितलं?

भारतात असलेले इस्त्रायलचे राजदूत रेउवेन अजार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'पंतप्रधान नेतन्याहू हे जिवंत आहेत. मी स्वत: त्यांना अनेकदा बघितलं आहे. त्यांचा कॅफेमधील व्हिडिओ खरा आहे. त्यांचा तो व्हिडिओ एआय नाही. नेतन्याहू पूर्णपणे ठणठणीत आहेत'. राजदूतांच्या विधानाने अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत या अफवा सामान्य मानल्या जातात. युद्धकाळात अपवा वेगाने पसरतात. परंतु अजार यांनी नेतन्याहू जिवंत आणि ठणठणीत असल्याचे सांगितलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची वार्ता खोटी आहे. युद्धकाळात कोणत्याही पुराव्याशिवाय अफवा पसरतात. नेतन्याहू यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्याशी संबंधित अफवेला पूर्णविराम मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT