Rules Changes From 1st August Saam Tv
देश विदेश

Rules Changes From 1st August: १ ऑगस्टपासून बदलणार 'हे' नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

Gas Cylinder Price Change From 1st August: १ ऑगस्ट २०२३ पासून देशात अनेक नियमांमध्ये बदल होणा आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटवर आणि खिशावर होणार आहे.

Priya More

Rules Change In India: जुलै महिना संपायला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. जुलै महिना संपून लवकरच ऑगस्ट महिना सुरु होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात अनेक नियम बदलतात. त्याचप्रमाणे १ ऑगस्ट २०२३ पासून देशात अनेक नियमांमध्ये बदल होणा आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटवर आणि खिशावर होणार आहे. या नवीन नियमांबद्दल आपल्याला जाणून घेणे खूपच गरजेचे आहे कारण यानुसार आपल्याला महिन्याच्या बजेटची प्लॅनिंग करता येते. चला तर मग जाणून घेऊया येत्या १ ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार आहेत... (Latest Marathi News)

१४ दिवस बँका राहणार बंद -

इतर महिन्यांप्रमाणेच आरबीआयने ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण येत आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकेत जाण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहणे सर्वांचासाठी चांगले असते. त्यामुळे तुमच्या बँकेशीसंबंधित कामामध्ये अडथळे येत नाहीत. रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन आणि इतर अनेक सणांमुळे देशभरातील बँका बंद राहतील. या व्यतिरिक्त रविवारी, दुसऱ्या-चौथ्या शनिवारीही बँका बंद राहतील.

एलपीजी सिलिंडर -

1 ऑगस्ट रोजी सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. तेल विपणन कंपन्या व्यावसायिक सिलिंडरसह घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती देखील बदलू शकतात. देशात दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला सिलिंडरच्या किमतीत बदल होत असतो. एलपीजी सिलिंडरच्या किमतीसोबत पीएनजी आणि सीएनजीचे दरही बदलू शकतात.

जीएसटीसाठी इलेक्ट्रॉनिक पावत्या -

५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायांना १ ऑगस्टपासून इलेक्ट्रॉनिक पावत्या (Electronic Invoice) द्याव्या लागणार आहेत. येत्या १ ऑगस्टपासून हा देखील बदल होणार आहे.

आयटीआरसाठी दंड -

आर्थिक वर्ष 2022-23 साठी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. तुम्ही या तारखेपर्यंत विवरणपत्र भरावे. आतापर्यंत ७ कोटींहून अधिक करदात्यांनी रिटर्न भरले आहेत. जर करदात्याने 31 जुलै 2023 नंतर रिटर्न फाइल केले तर त्याला दंड भरावा लागू शकतो. आयटीआर उशीरा भरल्यास 1,000 रुपये किंवा 5,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हीला आयटीआर भरण्यासाठी उद्यापर्यंतची मुदत आहे. जर तुम्ही उद्यापर्यंत हे काम केले नाही तर तम्हाला दंड भरावा लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT