Meghalaya High Court Saam TV
देश विदेश

योनी किंवा अंतर्वस्त्रावर पुरुषाचा अवयव घासणे म्हणजे बलात्कारच: मेघालय हायकोर्ट

IPC च्या कलम 375 नुसार योनीमध्ये लिंगप्रवेश केल्याचा कोणताही कलम त्याच्यावर लावण्यात आलेले नाही.

वृत्तसंस्था

गुवाहाटी: मेघालय उच्च न्यायालयाच्या (Meghalaya High Court) खंडपीठाने असा निर्णय दिला आहे की पुरुषानं त्याचं लिंग हे स्त्रीच्या योनीवर ठेवल्यास किंवा त्याचा संबंध तिच्या अंतर्वस्राशी आल्यास तो कलम 375 बी नुसार बलात्कार समजला जाईल. मुख्य न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी आणि न्यायमूर्ती डब्ल्यू डिएंगडोह यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सोमवारी एका खटल्यात हा निर्णय दिला आहे. 2018 साली दाखल केलेल्या एका खटल्याचा निकाल देताना न्यायमुर्तींनी संबंधीत नराधमाला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवले आहे.

अपीलातील मुख्य कारण असे होता की याचिकाकर्ता बलात्कार केल्याबद्दल दोषी आढळला होता. आणि त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 25,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली होती. परंतु IPC च्या कलम 375 नुसार योनीमध्ये लिंगप्रवेश केल्याचा कोणताही कलम त्याच्यावर लावण्यात आलेले नाही. याचिकाकर्ताने खटल्याची सुनावणी सुरु असताना सांगितले होते की त्याने बलात्कार केलेला नाही. परंतु उलत तपासणीमध्ये पिडीतेने सांगितले होते की आरोपीच्या लिंगाने योनीमध्ये प्रवेश केला नव्हता फक्त अंतर्वस्रावर लिंग ठेवले होते.

याचिकर्त्याच्या म्हणण्यानुसार, मी पिडीतेचे अंतर्वस्राव उतरवले नाही. मी फक्त तिने अंतर्वस्रा घातलेले असताना त्यावर लिंग ठेवले तो बलात्कार असू शकत नाही. याचिकाकर्त्याने असेही सांगितले की जेव्हा खटल्यादरम्यान पीडितेने तिच्या उलटतपासणीत सांगितले होते की तिला कसल्याही वेदना झालेल्या नाहीत त्यामुळे मला इतकी कठोर शिक्षा का व्हावी आणि माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल व्हावा असं वाटत नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Lonari And Samadhan Sarvankar Wedding: शुभमंगल सावधान! तेजस्विनी झाली समाधानची राणी, लग्नसोहळ्यातील पहिला फोटो समोर

Maharashtra Live News Update : कल्याण ग्रामीण पट्ट्यातील गावात बिबट्याचे दर्शन

सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का; प्रसिद्ध निर्माता काळाच्या पडद्याआड

Uddhav Thackeray : मातोश्रीवर बड्या नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

SCROLL FOR NEXT