Mohan Bhagwat SaamTv
देश विदेश

Mohan Bhagvat : 'आरएसएस नसते, तर हिंदूंना ..' , सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

RSS Sarsanghachalak Mohan Bhagwat Statement : राष्ट्रीय स्वयंसेवर संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उडुपी मठातील गीता मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात आरएसएसच कौतुक केलं आहे.

Saam Tv

बंगळूर : भगवद्‌गीता जेव्हा सामान्य जनतेसाठी सुलभ भाषेत सादर केली जाते, तेव्हा ती समाजासाठी मार्गदर्शक शक्ती म्हणून काम करू शकते. आरएसएस नसते, तर हिंदूंना देशात आणखी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला असता, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवर संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. रविवारी उडुपी मठातील गीता मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

उडुपी मठात त्यांची पूज्य सुगुणेंद्र तीर्थ स्वामी यांच्याशी सौहार्दपूर्ण भेट झाली. यादरम्यान मोहन भागवत यांनी भागवत गीतेचा संदेश देण्यासाठी 'अनुभव मंडपम' या अनुभव नाट्यगृहाचे उद्घाटनही केले. यावेळी मोहन भागवत म्हणाले की, गीता ही जीवनात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक आहे, ती म्हातारपणी वाचावी असे पुस्तक नाही. ही मूल्ये बालपणापासूनच दैनंदिन जीवनात रुजवली पाहिजेत.

सनातन धर्माचे जतन प्रत्येक हिंदूने, पालनपोषण आणि संवर्धन केले पाहिजे. तसंच त्यांच्या वचनबद्धतेबाबत खंबीर राहिले पाहिजे, यावर राष्ट्रीय स्वयंसेवर संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भर दिला. त्याचबरोबर धार्मिक नेते आणि संतांना आध्यात्मिक मूल्ये आणि राष्ट्रीय आदर्शाचे समर्थन करण्यासाठी समाजाला अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन करण्याचेही आवाहन त्यांनी केले.

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, युद्ध असो किंवा इतर कोणतीही परिस्थिती भगवान कृष्णाने अर्जुनाला आव्हानांना सामोरे जाण्याचा आणि त्यांच्यापासून पळून न जाण्याचा सल्ला दिला. प्राचीन काळापासून चालत आलेली विचारसरणी पूर्णत्वाला पोहोचली आहे. गीतेनंतर भारतात आणि जगात आलेल्या विचारप्रवाहांचा अभ्यास केला तर लक्षात येते की हे सर्व गीतेमध्ये आधीच आहे. ही पुस्तके आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मठाचे स्वामीजी सुगुणेंद्र तीर्थ स्वामीजी यांनी भागवत यांना 'हिंदू सम्राट' या पदवीने सन्मानित केले. सनातन धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 'श्रीकृष्ण गीतानुग्रह पुरस्कार' प्रदान केला. सुगुणेंद्र तीर्थ स्वामीजी यांनी 'आरएसएस'च्या योगदानाचे कौतुक केले. मुकुंदमठाचे दिवाण एम. नागराज आचार्य आदी संघाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT