Kaali Peeli Taxis : मुंबईची शान असलेल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या घटली, फक्त 13,000 शिल्लक

Mumbai Kaali Peeli Taxis : मुंबईतील काळी पिवळी टॅक्सींची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. यामागे नेमकं कारण काय?
Kaali Peeli Taxi
Kaali Peeli TaxiSaamtv
Published On

मुंबई: मुंबईत धावणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या गेल्या वर्षभरात 20,000 वरून 13,000 वर घसरली आहे, अशी माहिती शहरातील सर्वात मोठ्या संघटना असलेल्या मुंबई टॅक्सीमन्स असोसिएशने दिली आहे. त्यांनी याचे मुख्य कारण चालकांकडून परवाने नूतनीकरण न करणे असल्याचे सांगितले आहे.

काय आहेत घट होण्यामागील कारणे?

असोसिएशनच्या मते, काही चालक पर्यटक परवाने घेऊन ओला/उबेरसारख्या अॅप आधारित सेवांमध्ये सहभागी होण्याचा किंवा खासगी प्रवासी वाहतूक व्यवसायाकडे वळण्याचा पर्याय निवडत आहेत. तसेच, अनेक चालक कुटुंबांतील तरुण पिढी या व्यवसायात येण्यास तयार नसल्याने टॅक्सी चालकांची टंचाई वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Kaali Peeli Taxi
Kaali Peeli Taxi: ६ दशकांच्या प्रवासाला कायमचा ब्रेक; मुंबईच्या रस्त्यांवरुन काळी - पिवळी 'पद्मिनी टॅक्सी' होणार गायब

मुंबई टॅक्सी असोसिएशनच्या मते जुनी आणि मोडकळीस आलेली वाहने विकण्यासाठी संघर्ष करणाऱ्या चालकांना नव्या आणि महागड्या टॅक्सीसाठी कर्ज मिळवण्यात अडचणी येत आहेत. उदाहरणार्थ, पूर्वी मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या ओम्नी टॅक्सीजची संख्या आता जवळजवळ संपुष्टात आली आहे. काही चालकांनी ईको टॅक्सी घेतली, तर इतरांनी व्यवसायच सोडून दिला, कारण या व्यवसायातून फारसा फायदा होत नसल्याचे त्यांना वाटते.

Kaali Peeli Taxi
Electric Water Taxi Service: मुंबईची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार, शहरात लवकरच ई-वॉटर टॅक्सी धावणार, तिकीट किती?

काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या पुढेही घटणार?

स्वाभिमान ऑटो टॅक्सी युनियनने दिलेल्या माहितीनुसार काळ्या-पिवळ्या टॅक्सीची संख्या येत्या वर्षाअखेरपर्यंत आणखी कमी होण्याची शक्यता आहे, कारण त्या टप्प्याटप्प्याने रस्त्यावरून हटवल्या जात आहेत. पूर्वी व्यावसायिक भागांतील स्टँडवर 20-30 टॅक्सीज दिसायच्या, आता तिथे फक्त 5-10 टॅक्सी उभ्या असतात.

म्हणून काळ्या-पिवळ्या टॅक्सींचे महत्त्व टिकून आहे

अधिकाऱ्यांप्रमाणे, मुंबईकरांमध्ये काळ्या-पिवळ्या टॅक्सींविषयी भावनिक संबंध अजूनही कायम आहे. ऑफिसला जाणारे संजय कदम म्हणाले, काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकाला शहरातील रस्ते आणि शॉर्टकट चांगले माहीत असतात. त्यांनी दिलेला एसी प्रवास अनेकदा आनंददायी असतो.

सोयीसुविधांची कमतरता आणि दंडाची भीती

रस्त्याचे रुंदीकरण आणि पायाभूत सुविधा कामांमुळे टॅक्सींसाठी स्टँडची संख्या घटली असून सुमारे 5,000-10,000 स्टँडची गरज आहे. शिवाय, रोजच्या दिवसागणिक लागू होणाऱ्या दंडामुळे चालकांना त्रास होतो. एका वेळी 500 रुपये आणि दुसऱ्यांदा 1,500 रुपये दंड भरावा लागतो, जो त्यांच्या दिवसाच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे.

पूर्वीचे सुवर्णयुग संपले

दोन दशकांपूर्वी काळ्या-पिवळ्या प्रीमियर पद्मिनी टॅक्सींची संख्या 63,000 होती. आता या सर्व टॅक्सी हटवल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे, ओम्नी टॅक्सींचीही संख्या कमी झाली असून, मुंबईच्या रस्त्यांवरील एकूण टॅक्सीजची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com