Electric Water Taxi Service: मुंबईची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार, शहरात लवकरच ई-वॉटर टॅक्सी धावणार, तिकीट किती?

Electric Water Taxi Service in Mumbai: मुंबईची वाहतूक कोंडीपासून लवकरच सुटका मिळणार आहे. शहरात लवकरच ई-वॉटर टॅक्सी धावणार आहे.

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी हाती आली आहे. मुंबईत पहिली ई-वॉटर टॅक्सी धावणार आहे. ही इलेक्टिक वॉटर टॅक्सी लवकरच सुरु होणार आहे. यासाठी माझगाव डॉकमध्ये ६ वॉटर टॅक्सीची निर्मिती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका कंपनीने इलेक्ट्रिक टॅक्सी सेवेचा प्रस्ताव राज्य आणि केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. या सेवेला हिरवा कंदील मिळताच स्वदेशी इलेक्ट्रॉनिक टॅक्सी धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

'सकाळ'च्या वृत्तानुसार, ई-वॉटर टॅक्सी सेवेमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स सेवेचं भाडेचे जास्त होते. त्यामुळे या सेवेकडे अनेकांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सीचा पर्याय समोर आला आहे. टॅक्सी सेवा इलेक्ट्रॉनिक असल्याने तिकीट दर देखील कमी असण्याची शक्यता आहे. विविध प्रकारचे सहा इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तयार आहेत. इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस कंपनीने २४ सीटरची वॉटर टॅक्सी खरेदी केली आहे. या टॅक्सीचे काही कामे तयार आहेत.

टॅक्सी कशी आहे?

लांबी : १३.२७ मीटर

बॅटरी : ६४ किलो वॉट (चार तास)

आसनक्षमता : २४

रुंदी : ३.०५ मीटर

वेग : १४ नॉटिकल मैल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com