RSS Postage Stamp and coin Saam Tv
देश विदेश

RSS ला १०० वर्षे पूर्ण, PM मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि स्मारक नाणं जारी; काय आहे वैशिष्ट्ये?

RSS Postage Stamp and coin: आरएसएसला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पीएम मोदी यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि स्मारक नाणं प्रकाशित करण्यात आले.

Priya More

Summary -

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली.

  • आरएसएसच्या शताब्दी वर्षाचा सोहळ्याच्या कार्यक्रमाला पीएम मोदींची उपस्थिती.

  • पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टपाल तिकीट आणि स्मारक नाण्याचे प्रकाशन करण्यात आले.

  • नाण्यावर भारतमाता आणि राष्ट्रीय चिन्हाची प्रतिमा आहे.

राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. आरएसएसच्या स्थापनेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात पीएम मोदी यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित करण्यात आले. यावेळी पीएम मोदी यांनी आरएसएसचे कौतुक केले. पीएम मोदींनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितले की, 'आरएसएसचा गौरवशाली १०० वर्षांचा प्रवास हा त्याग, निस्वार्थ सेवा, राष्ट्रनिर्माण आणि शिस्तीचे एक असाधारण उदाहरण आहे. आपली स्वयंसेवक पिढी भाग्यवान आहे जी आरएसएसच्या शताब्दी वर्षाचे साक्षीदार झाले आहेत'

पंतप्रधान म्हणाले की, स्थापनेपासूनच आरएसएसने राष्ट्रनिर्माणावर लक्ष केंद्रित केले आहे. १९६३ मध्ये संघ स्वयंसेवकांनी २६ जानेवारीच्या परेडमध्येही भाग घेतला होता. त्यांनी देशभक्तीच्या तालावर मोठ्या अभिमानाने आणि सन्मानाने परेड केली. देशसेवा करण्यात आणि समाजाला सक्षम करण्यात सतत गुंतलेल्या संघाच्या स्वयंसेवकांचे प्रतिबिंब या टपाल तिकिटातही दिसून येते. या स्मारक नाण्यांसाठी आणि टपाल तिकिटांसाठी मी देशवासीयांना मनापासून शुभेच्छा देतो.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे सांगितले की, 'आज भारत सरकारने संघाच्या १०० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे स्मरण करण्यासाठी विशेष टपाल तिकिटे आणि स्मारक नाणी जारी केली आहेत. १०० रुपयांच्या नाण्यावर एका बाजूला राष्ट्रीय चिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंहासह वरद मुद्रेत भारतमातेची भव्य प्रतिमा आहे. संघाच्या शताब्दी वर्षासारख्या एका महान प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत हे आपल्या पिढीतील स्वयंसेवकांचे भाग्य आहे.

तसंच, 'आज महानवमी आहे. आज देवी सिद्धिदात्रीचा दिवस आहे. मी माझ्या सर्व देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. उद्या विजयादशमीचा महान सण आहे. अन्यायावर न्यायाचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय आहे.', असे देखील पीएम मोदी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Adasa Temple Travel: नागपूरमधील आडासा मंदिरापर्यंत मुंबईहून कसे जाल? जाणून घ्या सर्वोत्तम मार्ग

'प्रशांत अन् डॉक्टर तरूणीचे संबंध' Whatsapp Chatsमधून पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती

Paresh Rawal: 'खरं सांगायचं तर स्क्रिप्ट…’; परेश रावल यांना नाही करायचं 'दृश्यम ३'मध्ये काम, कारण सांगत म्हणाले...

Pathnatya History: पथनाट्यांची सुरुवात कशी झाली? इतिहास जाणून घ्या

Maharashtra Live News Update: भरधाव कार ने पिकअप ला दिली धडक, दोन जण गंभीर जखमी..

SCROLL FOR NEXT