RSS Chief Mohan Bhagwat: देशाच्या दृष्टीनं किमान तीन अपत्य हवे; मोहन भागवत यांचे विधान

RSS chief Mohan Bhagwat Statement: आपली परंपरा आणि ज्ञान समजण्यासाठी संस्कृतचे प्राथमिक ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचे ज्ञान असणं हे अनिवार्य नाहीये, पण भारताला योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी संस्कृतचा अभ्यास आवश्यक आहे, असं आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणालेत.
RSS chief Mohan Bhagwat at centenary event
RSS chief Mohan Bhagwat at centenary event
Published On
Summary
  • प्रत्येक कुटुंबात किमान तीन मुले असावीत, असं विधान मोहन भागवत यांनी केले आहे.

  • लोकसंख्या घटू नये म्हणून तीन मुलं आवश्यक आहे.

  • संस्कृतचं प्राथमिक ज्ञान भारत समजण्यासाठी महत्त्वाचं असल्याचं मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाचा आज तिसरा दिवस होता. यावेळी प्रश्नोत्तरांचे सत्र झाले असून मोहन भागवत यांना अनेक प्रश्न विचारण्यात आली. या प्रश्नात भागवत यांना अपत्य किती असावीत असा प्रश्न करण्यात आला. त्याला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले, पुरेशी लोकसंख्या असण्यासाठी एका कुटुंबात तीन मुलं असणं गरजेचे आहे. जर तीन मुले असली तर आई-वडील आणि मुलाचं आरोग्य ठीक राहत असते. देशाच्या दृष्टीने तीन मुलं ठीक असतात, पण तीनपेक्षा जास्त मुलं नकोत असं मोहन भागवत म्हणालेत.

RSS chief Mohan Bhagwat at centenary event
Mohan Bhagwat Speech: 'हिंदुंनी दुर्बल राहणे अपराध...' सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन; मोदी सरकारलाही दिला खास संदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या समारंभावेळी बोलताना भागवत म्हणाले, भारताचे लोकसंख्या धोरण २.१ मुल असं आहे. म्हणजेच एका कुटुंबात तीन मुले. प्रत्येक नागरिकांनी आपल्या कुटुंबात तीन मुले असतील याची काळजी घेतली पाहिजे. "सर्व नागरिकांनी तीन मुले जन्माला घालण्याचा विचार करावा, जेणेकरून लोकसंख्या पुरेशी असेल आणि नियंत्रणात राहील."

RSS chief Mohan Bhagwat at centenary event
Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

भारताच्या लोकसंख्या धोरणाचा संदर्भ देताना भागवत म्हणाले, आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण १९९८ किंवा २००२ मध्ये बनवण्यात आले होते. त्यात कोणत्याही समुदायाची लोकसंख्या २.१ पेक्षा कमी नसावी. एखाद्याला अर्धवट मुले असू शकत नाही ना, म्हणून लोकसंख्याशास्त्रानुसार, आपल्याला प्रत्येक कुटुंबात किमान तीन मुले असणे आवश्यक आहे, असा उल्लेख आहे.

संघाने विभाजनाला विरोध केलाय

भागवत म्हणाले की, जेव्हा काही लोकांनी एम.एस. गोळवलकरांना विचारले की फाळणी होईल का, तेव्हा संघाने त्याला विरोध केला होता. त्यावेळी संघाची ताकद खूपच कमी होती. फाळणीविरुद्ध प्रयत्न झाले आणि मध्येच भेटण्याचे प्रयत्नही झाले, पण आता काहीही करता येत नाही. अखंड भारत' हे केवळ राजकारण नाही तर ते एक वास्तव आहे. ते जीवनाचे वास्तव आहे. ते भारताचे वास्तव प्रतिबिंबित करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com