madhya pradesh crime saam tv
देश विदेश

राजघराण्यात रक्तरंजित थरार; भाजप आमदाराच्या सुनेवर गोळीबार, राजकीय वर्तुळात खळबळ

madhya pradesh crime : मध्य प्रदेशात भाजप आमदाराच्या सुनेवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

राजघराण्यात घडला रक्तरंजित थरार

राजघराण्यतील भाजप आमदाराच्या सुनेवर गोळीबार

गोळीबारात आमदाराची सून गंभीर जखमी

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील नागौद येथील राजघराण्यात रक्तरंजित थरार घडला आहे. माजी मंत्री, भाजप आमदार नागेंद्र सिंह यांचे पुतणे बाबा राजा यांच्या पत्नी योगिता सिंह यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. योगिता सिंह यांच्या पोटात गोळी झाडण्यात आली. या गोळीबारात जखमी झालेल्या योगिता सिंह यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

योगिता यांना सुरुवातीला सतना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सतना येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना रीवा येथील विंध्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उशिरा रात्री शस्त्रक्रिया करून पोटात अडकलेली गोळी काढण्यात आली. रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक तपासात सुनिता सिंह यांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे. सुनीता यांचे बाबा राजा यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा दावा केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस अधिकारी रघू केशरी यांनी सांगितलं की, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे'. तर योगिता सिंह यांच्या आई नरेंद्र कुमारी यांनी घटनेचा निषेध करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT