Chrisitano Rolaldo
Chrisitano Rolaldo  Twitter @Cristiano
देश विदेश

रोनाल्डोच्या 'त्या' दोन शब्दांचा 'कोका कोला'ला ३० हजार कोटींचा फटका

वृत्तसंस्था

एलोन मस्कच्या एका ट्विटमुळे बिटकॉइनची (Bitcoin) किंमत वाढलेलं तुम्ही पहिलाच असेल. त्या ट्विटमुळे कंपनीचे शेअर्स वाढलेलं देखील तुम्ही पाहिलं असेल. हाच प्रकार आता कोका-कोला सारख्या दिग्गज कंपनी सोबत घडला आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) दोन शब्दामुळे कोको- कोला कंपनीचे शेअर्स सुमारे ३० हजार कोटींवर घसरले आणि त्या कंपनीला मोठा धक्का बसला. (Ronaldo's 'those' two words hit Coca-Cola by Rs 30,000 crore)

नक्की काय घडले?

युरो चषकाचा २०२० (Euro Cup 2020) चा फुटबॉल हंगाम सध्या खेळाला जात आहे. पोर्तुगाल संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले होते. रोनाल्डो जेव्हा पत्रकर परिषदेला बसला तेव्हा टेबलवर दोन कोको- कोलाच्या बाटल्या आणि पाण्याची बाटली ठेवली होती. रोनाल्डोने तिथे ठेवलेल्या दोन बाटल्या काढल्या आणि म्हणाला 'ड्रिंक वॉटर'. या २ शब्दाचा कोका-कोला (Coca Cola) कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणात फटका बसला की त्यांचे शेअर्स जवळपास ४ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरले. दरम्यान, युरोपमध्ये बाजारपेठ सुमारे ३ वाजता उघडली होती. त्यावेळी कोको- कोलाचा शेअर ५६.१० डॉलर होता. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर रोनाल्डोची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच कोका- कोलाचे शेअर्स झपाट्याने घसरू झाले आणो ते आले ५५.२२ डॉलरवरती त्यानंतर कोका- कोलाचा शेअर सतत खाली वर होत आहे.

इंग्लंडविरुद्ध महिला संघाला मिळाली नाही नवीन खेळपट्टी; ईसीबीने मागितली माफी

कोको- कोलाची प्रतिक्रिया काय ?

कोका- कोला हा युरो चषकाचा अधिकृत प्रायोजक आहे. म्हणून युरो चषकाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कोका- कोलाच्या बॉटल ठेवल्या जातात. त्यावर कोको- कोला कंपनीने उत्तर देताना सांगितले की आम्ही प्रायोजक म्हणून प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये किंवा सामन्यादरम्यान पेय देत असतो. आता ते प्यायचे का नाही ते प्रत्येकाच्या मनावर अवलंबून आहे. आपल्या सर्वाना ठाऊक आहे की रोनाल्डोची गणना जगातील सर्वोत्तम फुलबॉल पटूमध्ये होते. त्याचे सोशियल मीडियावर फॅन आहेत. त्यामुळे त्याने बोललेल्या २ शब्दांचा कोको-कोला कंपनीला मोठा धक्का बसला आहे.

Edited By - Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT