Himachal Pradesh Rohtang Accident  Saam tv
देश विदेश

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Himachal Pradesh Rohtang Accident : मनालीतील रोहतांगमध्ये भरधाव कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Vishal Gangurde

हिमाचल प्रदेशच्या मनालीजवळ भीषण अपघात झाला. या भीषण कार अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला. जखमींची ओळख होणे बाकी आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मनालीच्या रोहतांगजवळ कार अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या दुर्घटनेत कारमध्ये असलेल्या ५ पैकी ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. मनालीचे पोलीस उपअधीक्षक केडी शर्मा यांनी दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच बचाव कार्य सुरु असल्याचेही त्यांनी सांगितलं.

कसा झाला अपघात?

रोहतांगमधील या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'कार अनियंत्रित झाली. चालक हा कारला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत होता. परंतु कार थांबली नाही. त्यानंतर ही कार थेट दरीत कोसळली. व्हिडिओमध्ये रस्त्यावर कारच्या टायरच्या खुणा दिसत आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मनाली पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृत पावलेल्या लोकांचा मृतदेह रेस्कू करायला सुरुवात केली होती. अपघातातील मृतांची ओळख अद्याप झालेली नाही. कारमधील लोक पर्यटक असल्याचं बोललं जात आहे.

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांच्या बसचा अपघात

दरम्यान, अमरनाथ जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसचाही भीषण अपघात झाला. अमरनाथला जाणाऱ्या ५ बसचा शनिवारी अपघात घडला. ५ बस एकमेकांना धडकल्याने अपघाताची घटना घडली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ही दुर्घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत साधारण ३६ यात्रेकरू किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

SCROLL FOR NEXT