Rajasthan Dausa suicide case Chaiwala startup founder saam tv
देश विदेश

प्रसिद्ध व्यावसायिक रोहित शर्मा यांनी उचललं टोकाचं पाऊल; मोठी खळबळ

Jaipur Entrepreneur Rohit Sharma Death Full Details: राजस्थानातील चायवाला स्टार्टअपचे संस्थापक रोहित शर्मा यांनी दौसा येथील निवासस्थानी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

राजस्थान: चायवाला या कंपनीचे संस्थापक रोहित शर्मा यांनी जयपूरच्या दौसा येथील त्यांच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहित शर्मा हे साकेत कॉलनीमध्ये राहत होते. शनिवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे. कुटुंबीयांनी दरवाजा तोडून त्यांना खाली उतरवले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पोस्टमार्टमनंतर त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अमोर आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रोहित शर्मा यांचे वडील हितेंद्र मोहन शर्मा हे मेडिकल स्टोअर चालवतात, तर त्यांची पत्नी एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. या दोघांना एक सात वर्षांचा मुलगा आहे. रोहित शर्मा यांनी वयाच्या 17 व्या वर्षी नर्सिंगचे शिक्षण घेत असताना आपल्या व्यावसायाची सुरुवात केली होती. त्यांनी जयपुरमध्ये चायवाला हा स्टार्टअप सुरू केला. दौसा येथे सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता, असे पीटीआयने म्हटले आहे.

जयपूरच्या मानसरोवरमधील शिप्रा पाथ येथे त्यांनी पहिला टी-कॅफे सुरू केला. त्यानंतर शहरात आणखी एक शाखा उघडत त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. पुढे त्यांनी विविध शहरांमध्ये ‘चायवाला’च्या एकूण सात शाखा सुरू केल्या. मात्र, सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांनी सर्व आउटलेट्स बंद करून अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात ते विविध धार्मिक स्थळांना भेट देताना दिसत होते.

टीप - आत्महत्या करणं हा कोणत्याही अडचणीवर किंवा समस्येवरचा पर्याय नाही. आत्महत्येचा विचार करत असाल तर मानसोपचारतज्ज्ञांशी बोलून उपाय शोधू शकता. यासाठी सरकारी हेल्पलाइन नंबर १४४१६ आहे. २४x७ संपर्क साधता येतो. इतर अनेक हेल्पलाइन नंबर उपलब्ध आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हेल्पलाइन - १८००-५९९-००१९, मुंबई - ०२२- २४१३१२१२ यावर संपर्क करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Job Opportunity: 9 ते 5 नोकरी नको; दारूची चव ओळखण्याचं मिळतं लाखोंचं मानधन, या हटके करिअरबद्दल जाणून घ्या

एसटी महामंडळाला विठुराया पावला! पंढरपूर वारीतून तब्बल 'इतक्या' कोटींचं उत्पन्न, सरनाईकांची माहिती

Skin Care Tips : चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरा हे नैसर्गिक फेसपॅक; त्वचा दिसेल तरुण

August 2026 Festival List : श्रावणात येणार 'हे' 10 मोठे सण; तारीख चुकवू नका, संपूर्ण यादी पाहा

Jasprit Bumrah : टीम इंडियाला मोठा धक्का! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बुमराह बाहेर; कुणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT