Manasvi Choudhary
बनारस स्टाईल हाजमोला चहा हा प्रसिद्ध आहे. बनारस गेल्यानंतर हा चहा पर्यटक आवर्जून पितात.
हाजमोला चहा हा आरोग्यासाठी देखील गुणकारी मानला जातो. हाजमोला चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, मूड फ्रेश होतो.
हाजमोला चहा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही घरीच हा चहा बनवू शकता.
हाजमोला चहा बनवण्यासाठी दालचिनी, लवंग, गूळ, काळे मीठ, जिरा पावडर, हाजमोला गोळी, लिंबू, पुदीना हे साहित्य एकत्र करा.
हाजमोला चहा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळवत ठेवा.
नंतर या पाण्यात लिंबाचा रस , गूळ, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि हाजमोला गोळी पावडर मिक्स करा.
संपूर्ण मिश्रण चांगले उकळून घ्या चहा उकळल्यानंतर यात तुम्ही पुदीन्याची पाने मिक्स करा.
चहा उकळला की गाळून एका कपामध्ये घ्या अशाप्रकारे हाजमोला चहा तयार होईल.