Robot Killed Worker Saam Tv
देश विदेश

Robot Killed Worker: रोबोटने घेतला कर्मचाऱ्याचा जीव! बॉक्ससारखं उचलून ऑटोमॅटिक पॅनलवर फेकलं

South Korea News: गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Ruchika Jadhav

South Korea:

दक्षिण कोरियामध्ये रोबोटने माणसाची हत्या केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. रोबोट बॉक्स आणि माणूस यांच्यात फरक करू शकत नाही यामुळे ही घटना घडली आहे. दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने दिलेल्या माहितीनुसार, रोबोटिक आर्ममध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोबोटिक आर्म म्हणजे वस्तू ठेवण्यासाठी हातासारखे उपकरण असते. या रोबोटिक आर्मकडे डबे उचलून पॅनेलवर ठेवण्याचे काम होते. पण या रोबोटिक आर्मने माणसाला बॉक्ससारखं पकडलं.

रोबोटचे काम करतानाचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. रोबोटिक आर्म वस्तू उचलून ऑटोमॅटिक पॅनेलवर ठेवतात आणि वस्तू पुढे सरकतात. रोबोटिक आर्मच्या याच फंक्शनमुळे रोबोटिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

योनहॅप न्यूजच्या माहितीनुसार, कर्मचारी रोबोटचे काम तपासत असताना हा अपघात झाला. रोबोटिक आर्मने कर्मचाऱ्याला बॉक्सला जसं पकडतात तसे पकडले आणि ऑटोमॅटिक पॅनेलच्या दिशेने ढकलले. यामुळे कर्मचाऱ्याच्या चेहऱ्याला व छातीला गंभीर इजा झाली. गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

योनहॅप न्यूज एजन्सीने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, कर्मचारी ८ नोव्हेंबर रोजी रोबोटचे सेन्सर ऑपरेशन चेक करत होते. ही टेस्टींग 6 नोव्हेंबरला होणार होती, मात्र रोबोटच्या सेन्सरमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे ही चाचणी दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. मात्र रोबोटमधील तांत्रिक बिघाड तसाच राहिला होता आणि बिघाड एका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT