AIADMK shifts MLAs to a Puducherry resort amid intense political uncertainty in Tamil Nadu after the hung assembly verdict. Saam
देश विदेश

'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा थरार! AIADMK ला फोडाफोडीची धास्ती, आमदारांना राज्याच्या बाहेर नेलं; तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ

AIADMK Resort Politics Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेवरून मोठा राजकीय थरार सुरू आहे. विजय यांच्या TVK पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने AIADMK ने आमदारांना पुदुचेरीतील रिसॉर्टमध्ये हलवलं.

Namdeo Kumbhar

तामिळनाडूमध्ये एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. विजय यांना सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, पण सत्तास्थापनेसाठी त्यांना इतरांच्या कुबड्या घ्याव्या लागणार आहेत. विजय यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला, पण ११८ आमदारांचा पाठिंबा नसल्याने राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांनी हा दावा फेटाळला. त्यातच अण्णाद्रमुक पक्षातील अर्धे आमदार फुटणार असल्याची बातमी धडकली. अण्णाद्रमुककडून आपल्या आमदारांना राच्याच्या बाहेर हलवलं आहे. तामिळनाडूच्या राजकारणात आता रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झाले आहे. विजय सत्तास्थापन करणार का? राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? याकडे देशाचे लक्ष लागलेय.

तामिळनाडूमध्ये मागील अनेक वर्षांपासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांचे वर्चस्व राहिलेय. द्रविडी राजाकरण केंद्रस्थानी असलेल्या तामिळनाडूत यंदा विजय यांच्या एन्ट्रीने मोठी उलथापालथ झाली. विजय यांनी १०८ जागा जिंकून दणक्यात एन्ट्री केली. पण सत्तास्थापनेसाठी ११८ आमदारांची गरज आहे. विजय यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेण्यासाठी सर्व तयारीही केली. पण राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या भूमिकेमुळे विजय थलपति यांच्या मार्गात अडथळे तयार झाले आहेत. बहुमतासाठी लागणाऱ्या ११८ आमदारांच्या सह्या असलेल्या पत्राची मागणी राज्यपालांनी केली. पण विजय यांच्याकडे बहुमत नसल्याने तामिळनाडूच्या राजकारणात रंगत आली आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा थरार पाहायला मिळत आहे. पक्ष फुटण्याच्या भीतीने एआयएडीएमकेनं नवनिर्वाचित आमदारांना पुदुचेरी येथे हलवण्यात आले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एआयएडीएमकेचे प्रवक्ते कोवाई सत्यन यांनी सांगितले की पक्षाच्या आमदारांना पुदुचेरीमध्ये ठेवण्यात आले आहे, परंतु किती आमदारांना हलवण्यात आले किंवा या निर्णयामागील कारणे त्यांनी स्पष्ट केली नाहीत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एडप्पाडी के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएडीएमके पक्ष, विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेला सरकार स्थापन करण्यास मदत करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार आहे. दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दुपारपासून टीव्हीके गोटातून कोणतेही उत्तर आले नाही. त्यातच पक्षातील काही आमदारांनी वेगळा गट करण्याची तयारी सुरू केली होती. त्यामुळे एआयएडीएमकेने प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या नेत्यांनी डीएमकेसोबतच्या युतीची कोणतीही शक्यताही फेटाळून लावली. आमदारांना पुदुचेरीमधील रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले आहे.

२३४ जागा -

टीव्हीके १०८

काँग्रेस - ५

पीएमके - ४

आययूएमएल २

सीपीआय - २

सीपीएम (एम) -२

व्हीसीके -२

डीएमके ५९

एआयएडीएमके ४७

भाजप - १

डीएमडीके - १

एएमएमके - १

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: घरकुल कामासाठी ३ हजारांची लाच घेताना सावरगावचा ग्रामरोजगार सेवक (acb)च्या जाळ्यात

Railway Rules: आता धावत्या ट्रेनमध्ये चढलात तर ₹२०००चा दंड; रेल्वे नवा कायदा करण्याच्या तयारीत

NESCO Drug Case : गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणाचं युरोप कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Trisha Krishnan : साऊथ सुंदरी त्रिशाची राजकारणात एन्ट्री; थलपथी विजय यांच्या जागेवर पोटनिवडणूक लढणार?

Government Employees Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगाराची ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार

SCROLL FOR NEXT