Fake currency  Saam Tv
देश विदेश

सावधान! तुमच्या खिशात नकली नोटा? बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट; पाहा RBI चा अहवाल

गेल्या वर्षी देशभरात 500 रुपयांच्या तब्बल 79,669 बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला आहे. कोरोना काळात हा बनावट नोटांचा काळाबाजार दुपटीने समोर आला आहे. सर्वाधिक बनावट नोटा या 500 रुपयांच्या असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे पुढे आली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या ताज्या अहवालानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात बनावट नोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. (Fake Currency Marathi News)

गेल्या वर्षी देशभरात 500 रुपयांच्या तब्बल 79,669 बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. मागील वर्षीच्या तुलनेत 2021-2022 या वर्षात 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 101.9 टक्के वाढ झाली आहे, तर 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 54.16 टक्के वाढ झाली आहे. मात्र, 100 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण कमी झाले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, 2021-22 मध्ये 2,000 रुपयांच्या तब्बल 13,604 बनावट नोटा सापडल्या. यामध्ये 2020-21 च्या तुलनेत 2 हजारांच्या बनावट नोटांमध्ये तब्बल 54.6 टक्के इतकी वाढ झाली. गेल्या आर्थिक वर्षात बँकिंग क्षेत्रात सापडलेल्या विविध मूल्यांच्या बनावट भारतीय चलनी नोटांची एकूण संख्या 2020-21 मध्ये 2,08,625 वरून 2,30,971 पर्यंत वाढली आहे. 2019-20 मध्ये 2,96,695 बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या.

बनावट नोटा रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 2016 मध्ये नोटाबंदीचे पाऊल उचलले. या अंतर्गत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. मात्र असं असून सुद्धा बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट सुरूच आहे. दरम्यान, चलनी नोटांच्या सुरक्षित प्रिंटिंगवर रिझर्व्ह बँकेने मोठ्या प्रमामात खर्च केला. गेल्या वित्तीय वर्षात आरबीआयने 4,984.80 कोटी रुपये खर्च केले. सुरक्षित उपायांचा सर्व शक्यतेचा विचार करुनही बनावट नोटांचा आळा घालण्यात अपयश आले आहे.

नोटांची छपाई कुठे होते?

भारतीय चलनातील नोटा केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार छापल्या जातात. केवळ सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये नोटांची छपाई केली जाते. देशभरात मान्यताप्राप्त चार छापखाने आहेत. नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी याठिकाणी नोटांची छपाई केली जाते. छपाईसाठी विशिष्ट प्रकारची शाई वापरली जाते. शाई स्विस बनावटीची असते. नोटांसाठी विशेष कागदही तयार केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Month: श्रावण महिन्यात मांसाहार का खाऊ नये? धार्मिक नव्हे तर 'हे' आहे वैज्ञानिक कारण

Beed News: बीडमध्ये तरुणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, तरीही आरोपी मोकाट,पोलिसांवर प्रश्नचिन्ह|VIDEO

Shocking News : नवविवाहित जोडप्यानं एकत्रच वशिष्ठी नदीत उडी मारली, काही महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Live News Update: पुण्यात कुत्र्याला वाचविण्यासाठी अतिसाहस अंगलट

Anardana Pudina Chutney : पंजाब स्पेशल 'अनारदाना पुदिना चटणी', आंबट-गोड चव जेवणाची वाढवेल रंगत

SCROLL FOR NEXT