CM बद्दल बोलाल, तर PMची आठवण करून देऊ; दीपाली सय्यद यांनी भाजपला ललकारलं

आज पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी ट्विट करत भाजपला ललकारलं आहे.
Deepali Sayyad vs BJP
Deepali Sayyad vs BJPSaam Tv
Published On

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayyad) आणि भाजपमध्ये (BJP) चांगलाच ट्विटर वॉर रंगला आहे. दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांवर (PM Narendra Modi) आक्षेपार्ह टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले होते. आज पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी ट्विट करत भाजपला ललकारलं आहे. (Deepali Sayad Latest News)

Deepali Sayyad vs BJP
राज्यसभेच्या रिंगणात नव्या उमेदवाराची एन्ट्री; मतांसाठी आमदारांना TATA Safari ची ऑफर

“अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ मुख्यमंत्र्या बद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ, दिल्लीत हुजर्या करणार्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवुन देऊ, दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. जय महाराष्ट्र ”, असं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर दीपाली सय्यद यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपाली यांनी ट्विट करत पंतप्रधानांवर जोरदार टीका केली होती. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं.

भाजपमध्ये घोटाळेबाज मंत्र्यांना पाठिंबा दिला जातो असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली होती. “किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा —- (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल”, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दीपाली सय्यद यांच्याविषयी

दीपाली यांनी अभिनयाशिवाय राजकारणातही प्रवेश केला आहे. विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य त्या करत असतात. पुरगस्तांची मदत असो किंवा मग मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारणं असो असे अनेक कार्यांत दीपाली यांनी लोकांची मदत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com