Zomato- Swiggy Delivery Boy Yandex
देश विदेश

Delivery Boy: गुड न्यूज! ॲमेझॉन, स्विगी आणि झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मिळणार पेन्शन, काय आहे संपूर्ण प्लान?

Zomato- Swiggy Delivery Boy: झोमॅटो, स्विगी आणि ॲमेझॉन यासारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना यापुढे पेन्शन मिळणार आहे.

Priya More

झोमॅटो, स्विगी, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लाखो डिलिव्हरी बॉय आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय आणि कर्मचारी या सर्व गिग कामगारांना पेन्शन मिळणार आहे. सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे, ओला, उबर आणि ॲमेझॉन सारख्या कंपन्यांनी या प्रस्तावाला सहमती देखील दर्शवली आहे. हा प्रस्ताव पुढील महिन्यात मंत्रिमंडळाकडे पाठवला जाण्याची शक्यता आहे.

गिग कामगार हे असे कर्मचारी असतात जे एखाद्या संस्थेमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करतात. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला जातो. यामध्ये फ्रीलांसर, ऑनलाईन सेवा प्रदान करणारे, कंटेट क्रिएटर्स, कंत्राटी कंपन्यांशी संबंधित कर्मचारी, डिलिव्हरी बॉय, कॅब ड्रायव्हर्स यांचा समावेश होतो. हे सर्व कर्मचारी हे तात्पुरत्या स्वरुपाचे कामगार असतात.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, झोमॅटो, स्विगी, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये काम करणाऱ्या गिग कामगारांना पेन्शन मिळणार आहे. ॲमेझॉन आणि झोमॅटोसह अनेक कंपन्यांनी गिग कामगारांना पेन्शन देण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शविली आहे आणि यासाठी विशिष्ट प्रमाणात योगदान देण्यास सांगितले आहे. या सर्व कंपन्या पेन्शनची ही रक्कम ईपीएफओमध्ये जमा करतील. गिग कामगारांना पेन्शन मिळविण्यासाठी दोन पर्याय असतील.

गिग कामगारांना पेन्शन मिळणार असल्याची बातमी समोर येताच या सर्व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयसह सर्व कामगारांना आनंद झाला आहे. देशातील गिग कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यावर्षी सादर करण्यात आलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गिग कामगारांसाठी एक विशेष व्यासपीठ सुरू करण्याबद्दल सांगितले होते. याद्वारे गिग कामागारांची ओळख पटवून त्यांना आरोग्य सेवांसह इतर फायदे देखील दिले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Bone Health: हाडं ठिसूळ किंवा कमकवूत झाली की शरीरात हे 5 मोठे बदल दिसून येतात

Gold Price Today : आज चांदी स्वस्त! सोन्याचे दर वाढले की घसरले? सुवर्णनगरीतील ताजे भाव जाणून घ्या

Shocking : भयंकर! बायको-पोरांसह ६ जणांची हत्या, आरोपीनं अख्ख्या कुटुंबाला संपवलं, धक्कादायक कारण आले समोर

SCROLL FOR NEXT