Nagpur News: नागपूर एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, चौघांचा मृत्यू, १५० कामगार वाचले

MMP Industries explosion : नागपूरच्या उमरेड एमआयडीसीतील MMP इंडस्ट्रीज कंपनीत स्फोट होऊन चौघांचा मृत्यू झाला, ११ कामगार जखमी झाले. सुमारे १५० कामगार उपस्थित असताना स्फोट झाला, अनेकजण थोडक्यात बचावले.
Nagpur Aluminum factory MIDC blast
Nagpur Aluminum factory MIDC blast
Published On

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur Aluminum factory MIDC blast : नागपूरमधील उमरेड एमआयडीसी मधील MMP इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात चौघांचा मृत्यू झाला, तर एकाचा शोध अद्याप घेतला जात आहे. या स्फोटामध्ये ११ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. १५० कामगार काम करत असताना स्फोट झाला होता, अनेकजण वाचले, चौघांचा मृत्यू झाला आहे.

सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास स्फोट होऊन लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरूच आहे. यामध्ये ११ कामगार गंभीर जखमी झालेत होते, यात चौघांचा मृत्यू, एकाच शोध सुरू आहे. काही जखमीवर नागपूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nagpur Aluminum factory MIDC blast
Scam : नागपुरातील सर्वात मोठा शिक्षक घोटाळा, तब्बल २०० कोटींचा गंडा, नेमकं प्रकरण काय?| VIDEO

मोठी दुर्घटना टळली, १५० जण थोडक्यात बचावले

शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी पाहणी केली. MMP ही ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे. ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. या कंपनीत एकूण १५० कामगार आहेत..सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कामावर होते. स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. दरम्यान कामगार आपला जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले. पण काही जण अडकले.

Nagpur Aluminum factory MIDC blast
Crime : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर जबरी हल्ला, कुस्तीच्या फडातच चोपला|VIDEO

जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला आहे. स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com