Jamaat-e-Islami Network Under Scanner 600 Held Saam
देश विदेश

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; ५०० ठिकाणी छापे अन् ६०० जणांना ताब्यात घेतलं

Jamaat-e-Islami Network Under Scanner 600 Held: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जम्मू-काश्मीरमध्ये ५०० ठिकाणी छापे टाकण्यात आले, ६०० जण ताब्यात.

Bhagyashree Kamble

  • लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटानंतर सुरक्षआ यंत्रणा सक्रिय

  • जम्मू काश्मीरमध्ये ५०० ठिकाणी छापेमारी

  • ६०० जणांना ताब्यात घेतलं

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ भीषण बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटामुळे १२ लोकांना प्राण गमवावे लागले. विविध एजन्सीद्वारे या घटनेचा तपास सुरू आहे. या स्फोटाचा संबंध जम्मू आणि काश्मीरशी जोडला गेला आहे. सध्या एजन्सींकडून संशयितांचा शोध सुरू आहे. स्फोटानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ५०० ठिकाणी छापे टाकले. तसेच ६०० जणांना ताब्यात घेतलं आहे. जमात ए इस्लामीविरूद्ध ही छापेमारी करण्यात आली आहे. एजन्सींचे म्हणणे आहे की, 'आम्हाला माहिती मिळाली होती की, जमात ए इस्लामी जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा स्वत:ला स्थापित करण्याच्या तयारीत आहेत. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली'.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर, पुलवामा, शोपियान, बारामुल्लासह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. तीन सरकारी कर्मचाऱ्यांसह सुमारे १० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय.

दरम्यान, 'डॉक्टर मॉड्यूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेटवर्कवरही कारवाई करण्यात आली आहे. गुरूवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सरकारी कर्मचाऱ्यांसह एकूण १० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी छापे टाकून तपासकर्त्यांनी अनंतनाग, पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यातून संशयितांना ताब्यात घेतले, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकशीतून असे उघड झाले की, काही संशयित गेल्या वर्षी तुर्कीला गेले होते. स्फोटकांच्या मोठ्या साठ्याबाबत पोलिसांनी डॉक्टरांसह सात जणांना अटक केली आहे. दरम्यान, तपासकर्त्यांनी 'व्हाईट कॉलर टेररिस्ट' मॉड्यूलशी संबंधित २०० हून अधिक व्यक्तींची चौकशी केलीये. या महिन्याच्या सुरूवातीला पोलिसांनी अटक केलेल्या २ दहशतवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे मॉड्यूल उघडकीस आले.

जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये २०० आणि श्रीनगरमध्ये १५० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. बारामुल्लाच्या सोपोरमध्ये पोलिसांनी ३० ठिकाणी छापे टाकले. छाप्यादरम्यानस अतिरेकी साहित्य, बंदी घातलेल्या संघटनांचे पोस्टर्स आणि गॅझेट्स जप्त करण्या आले आहे. एजन्सींच्या माहितीनुसार, जमात ए इस्लामी पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये सक्रीय होऊन अतिरेकी विचारसरणीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर तपास आणि कारवाईला वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Terror Blast: ३२ कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा कट, बॉम्ब स्फोटांचा खरा सूत्रधार कोण? हँडलरचे नाव आलं समोर

Potato Recipe : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT