नवी दिल्ली : सध्या चलनात ५०० रुपयांच्या बनावट नोटा आल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सरकारने २०१६ मध्ये ५०० रुपयांच्या आणि १ हजार रुपयांची नोटबंदी केली होती. यानंतर नवी ५०० रुपयांची नोट चलनात आणली. तेव्हापासूनच चलनात बनावट नोट आल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर आता आरबीआयने (RBI) एक निवेदन जारी केले आहे.
दर तीन महिन्यांनी नोटा तपासण्यासाठी आरबीआयने नोटांची स्थिती तपासण्यासाठी ११ मुद्दे निश्चित केले आहेत. यासाठी बँकांना नोट सॉर्टिंग मशिनऐवजी नोट फिट सॉर्टिंग मशीन वापरण्याचे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत.
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत ५०० रुपयांच्या दोन नोटा आहेत. एका नोटमध्ये गांधीजींच्या फोटो त्या शेजारी एक हिरवी पट्टी दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत गांधीजींच्या फोटोपासून बाजूला थोड्या अंतरावर हिरवी पट्टी आहे. ती पट्टी आरबीआयच्या (RBI) गव्हर्नर यांच्या स्वाक्षरीजवळ आहे.
या फोटोत खाली मेसेज आहे, यातील एक नोट बनावट आहे. पण अस काहीही नाही या दोन्ही नोट खऱ्या आहेत. यातील एकही नोट बनावट नाही. हा मेसेज सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता आरबीआयने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात बँकांना सूचना दिलेल्या आहेत. आरबीआय दर तीन महिन्यांनी बँकांना नोटा मोजण्याचे मशिनची चाचणी घेणअयास सांगत असते. मुद्रित नोटा विहित मापदंडानुसार आहेत की, नाही याची खात्री करुन घेणे. नोटांच्या योग्य स्थितीसाठी आरबीआयने ११ मानके निश्चित केली आहेत. तसेच बँकांना नोटा वर्गीकरण मशिनऐवजी नोटा फिट सॉर्टिंग मशीन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
फिट नोट ही ओरिजनल, स्वच्छ असते ज्यामुळे तिचे मूल्य सहज शोधता येते आणि जी पुनर्वापरासाठी योग्य असते. अनफिट नोट म्हणजे खराब झाली असेल पुन्हा वापरता येणार नाही, असं आपल्या निवेदनात आरबीआयने (RBI) सांगितले आहे.
नोट प्रोसेसिंग मशीन्स/नोट सॉर्टिंग मशिन्सने वेळोवेळी सत्यता तपासावी. मुळ नोटची सर्व वैशिष्ट्ये नसलेली कोणतीही नोट मशीनद्वारे संशयास्पद दाखवली जाईल. बँकांना चलनी नोटांचा फिटनेस अहवाल दर तीन महिन्यांनी आरबीआयला पाठवावा लागेल. बँकांना अयोग्य आढळलेल्या नोटांची संख्या आणि योग्य देखरेखीनंतर पुन्हा जारी करता येणार्या नोटांची माहिती आरबीआयला द्यावी लागेल, असंही आरबीआयने (RBI) निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.