RBI Governor Shaktikanta Das Saam Tv
देश विदेश

RBI Governor Shaktikanta Das: आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

Shaktikanta Das Admitted in Apollo Hospital Chennai: ६७ वर्षीय शक्तिकांत दास यांना ॲसिडिटीचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तपासणी करण्यासाठी त्यांना चेन्नई येथील अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

Priya More

भारतीय रिझर्व्ह बँके म्हणजेच आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ॲसिडिटीचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असून चिंता करण्याचे काहीच कारण नसल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. ओडिशा येथे जन्म झालेले ६७ वर्षीय शक्तिकांत दास हे आरबीआयचे २५ वे गव्हर्नर आहेत.

आरबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय शक्तिकांत दास यांना ॲसिडिटीचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तपासणी करण्यासाठी त्यांना चेन्नई येथील अपोलो रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन ते तीन तासांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

शक्तिकांत दास यांची प्रकृती ठीक असून त्यांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही. आरबीआय गव्हर्नरच्या प्रकृतीबाबत माहिती देताना रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नाही आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले उर्जित पटेल यांनी डिसेंबर २०१८ मध्ये सरकारसोबत झालेल्या वादानंतर अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारने शक्तीकांत दास यांची ३ वर्षांसाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली होती. यानंतर त्यांचा कार्यकाळ २०२१ मध्ये ३ वर्षांसाठी वाढवण्यात आला आणि त्यांचा कार्यकाळ या वर्षी १० डिसेंबर रोजी संपत आहे.

शक्तिकांत दास यांचा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून खूपच चांगला कार्यकाळ आहे आणि त्यांनी आर्थिक क्षेत्र उत्तम प्रकारे सांभाळले असल्याचे सर्वत्र दिसून येते. यासोबतच त्यांचे केंद्र सरकारशीही चांगले संबंध आहेत. त्यांच्या कार्यकाळात असे काहीही घडले नाही जे त्यांच्या आधीच्या दोन आरबीआय गव्हर्नरांच्या कार्यकाळात घडले होते. यावरून त्यांचा कार्यकाळ पुन्हा एकदा वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT