ration card google
देश विदेश

मोठी बातमी! घरात चारचाकी असेल तर मोठा झटका, रेशन कार्ड कायमचे बंद होणार, वाचा नवे नियम काय आहेत?

one nation one ration card new guidelines : रेशन कार्डधारकांसाठी मोठा बदल होणार आहे. घरात चारचाकी, एसी किंवा कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स भरत असल्यास रेशन कार्ड रद्द होऊ शकते. १ एप्रिलपासून नवे निकष लागू होणार असून देशातील सुमारे ७० लाख कार्डधारकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Ration Card New Rule changes : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठा बदल करण्यात येत आहे. जर तुमच्याकडे कार, एसी असेल अथवा कुटुंबातून कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमचं रेशन कार्ड कायमचं बंद करण्यात येणार आहे. तुम्हाला रेशनचा कोणताही लाभ घेता येणार नाही. विशेष म्हणजे हा नियम १ एप्रिलपासून (new ration card eligibility criteria from April 1) लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. देशातल्या ७० लाख रेशन धारकांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (New Ration Card Eligibility Criteria from April 1)

१ एप्रिलपासून नवे नियम येणार आहेत. रेशन कार्डधारकांची काटेकोर छाननी होणार आहे. गरजूंपर्यंत ही योजना पोहचवण्यासाठी सुधारित नियमावली जारी करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्य सक्षम असणाऱ्यांची नावे यादीतून रद्द करण्यात येणार आहे. देशात सुमारे ७० लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. वन नेशन, वन रेशन योजना लागू करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आलेला आहे.

केंद्र सरकारकडून वन नेशन, वन रेशन योजना राबवण्यासाठी निकष आणि कार्डची पात्रता अधिक कठोर करण्यात आलेली आहे. त्यामुळे फक्त निकषात बसणाऱ्यांना यापुढे मोफत धान्य मिळणार आहे. फक्त गरजू व्यक्तींनाच योजनेचा लाभ मिळावा, त्यासाठी सरकारकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. निकषात बसत नाहीत, त्या सर्वांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही संख्या ७० लाखांपर्यंत असू शकते. पण नवे नियम, निकष नेमके काय आहेत?

निकष काय आहेत ?

शहरी भागासाठी उत्पन्नाची मर्यादा ३ लाख निश्चित करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी २ लाखांची मर्यादा आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर रेशन कार्डचा लाभ घेता येणार नाही. चारचाकी गाडी, १०० चौरस मीटरपेक्षा जास्त प्लॉट, फ्लॅट असेल अथवा स्वतचे घर असेल तरीही अपात्र ठरवले जाणार आहे. घरात एसी, जनरेटर असेल अथवा कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तरीही रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. जर खोटी अथवा चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड वापरत असाल तर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून ईकेवायसी करण्यात येत होती. ई केवायसी केली नाही तरीही लाभ बंद करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील तिघांसह ६ जणांचा मृत्यू

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT