Ratan Tata News
Ratan Tata News Saamtv
देश विदेश

Ratan Tata News: उद्योजक रतन टाटा यांचा परदेशात डंका; ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने झाला गौरव

Gangappa Pujari

Ratan Tata honoured with ‘Order of Australia: भारतीय उद्योग जगतताील दिग्गज आणि टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचे भारतीय राजदूतांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. रतन टाटा यांना 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाचे (Australia) राजदूत (राजदूत) बॅरी ओ'फेरेल यांनी आपल्या ट्विटमध्ये "रतन टाटा यांनी भारताबरोबरच ऑस्ट्रेलियासाठीही योगदान दिले आहे. ते दिग्गज उद्योगपती आहेत. ऑस्ट्रेलिया-भारत संबंधांबद्दल दीर्घकालीन वचनबद्धतेची दखल घेऊन रतन टाटा यांना 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया'ने (AO)  सन्मानित करताना अतिशय त्यांना आनंद होत आहे." असे म्हणत रतन टाटा यांचे अभिनंदन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रतन टाटा यांची ऑस्ट्रेलिया-भारत द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक आणि परोपकारासाठी ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हिजनमध्ये मानद अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा पॉवर ओडिशा डिस्ट्रिब्युशन लिमिटेड (टीपीएसओडीएल) चे कार्यकारी राहुल रंजन यांनी या सोहळ्याचे फोटो देखील शेअर केले आहेत.

 या पोस्टमध्ये "रतन टाटा यांचं योगदान जगभर आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमता आणि दूरदृष्टीमुळे अनेकांनी आपलं ध्येय साध्य केलं आहे. तसेच रतन टाटा यांनी अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांनी सामाजिक कार्यासाठी दानशूपणा दाखवला आहे, असे राहुल रंजन यांनी म्हणले आहे.

भारताचे दानशूर कर्ण...

रतन टाटा यांचे नाव तर जगभरात त्यांच्या सामाजिक कार्य आणि देशप्रेमासाठी ओळखले जाते. आपल्या संपत्तीतील मोठ हिस्सा त्यांनी सामाजिक कार्यासाठी दान केला आहे. 1919 मध्ये टाटा ट्रस्टची (Tata Trust) स्थापना करण्यात आली. त्यावेळी 80 लाख रुपये दान करण्यात आले. टाटा ट्रस्ट ही भारतातील सर्वात जुनी सामाजिक संस्था आहे. या संस्थेमार्फत अनेक मोठ्या कामांसाठी सढळ हाताने दान देण्यात येते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

Pankaja Munde: 'मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्या', बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी; VIDEO

SCROLL FOR NEXT