Rashtraya Janta Dal Tejashwi Yadav Saam
देश विदेश

तेजस्वी यादव यांचं गणित कुठे फिसकटलं? या पाच कारणांमुळे निवडणुकीत अपयश आलं?

Rashtraya Janta Dal Tejashwi Yadav: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू. एनडीए मतदानाच्या सुरुवातीपासून आघाडीवर. महागठबंधनला मोठा धक्का बसण्याची शक्यता. राजदला मतदारांचा पाठिंबा का मिळाला नाही?

Bhagyashree Kamble

  • तेजस्वी यादव यांच्या काँग्रेससोबतच्या युतीचा राजदला फटका?

  • एनडीएकडे बिहारच्या मतदारांचा कल

  • तेजस्वी यादव यांचं कुठे चुकलं?

बिहार विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. एनडीए विरूद्ध महागठबंधन अशी चुरशी लढत पाहायला मिळत आहे. ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर रोजी २ टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीपासूनच एनडीए आघाडीवर असून, महागठबंधनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महागठबंधनने घोषित केलेल्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणाऱ्या तेजस्वी यादव यांना बिहार मतदारांचं कौल मिळालं नसल्याचं चित्र आहे.

तेजस्वी यादव यांनी निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने दिली होती. नोकरी, महिलांच्या खात्यात पैसे जमा करणे, रोजगार, विकास इत्यादी. मात्र, बहुतांश आश्वासने फोल ठरली. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांच्या रणनीतीमध्ये नेमक्या कोणत्या चुका झाल्या? त्यातील पाच महत्वाचे मुद्दे पाहुयात.

काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घातक ठरला

तेजस्वी यादव यांनी महागठबंधनमध्ये काँग्रेसचा समावेश करून मोठी चूक केली आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा प्रभाव कमी आहे. जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा देणे राजदला महागात पडले. या जागांवर त्यांचा पराभव झाला.

संघटनात्मक तयारीकडे दुर्लक्ष

जागावाटपावरून काँग्रेसला खूश करण्यासाठी तेजस्वींनी बराच वेळ खर्च केला. राहुल आणि प्रियांका गांधी यांची मान्यता घेण्यात अनेक महिने गेले. या काळात राजदने संघटनात्मक तयारीकडे दुर्लक्ष केले. काँग्रेसला मजबूत जागा दिल्याने राजदच्या अनेक दिग्गजांना संधी मिळू शकली नाही. तसेच अंतोष वाढला.

मुकेश साहनींना उपमुख्यमंत्रीपद ऑफर

व्हिआयपी पक्षाचे मुकेश साहनी यांना १० हून जास्त जागा. तसेच उपमुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु, साहनींचा प्रभाव केवळ काही भागांपर्यंत मर्यादित आहे. एका लहान पक्षाला एवढं महत्व देऊन तेजस्वींनी कोअर व्होट बँक (यादव मुस्लीम) यांना नाराज केलं आहे.

विकासाच्या मुद्द्यांऐवजी मत चोरीच्या मुद्द्यावर भर

नोकली, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा या मूळ मुद्द्यांवर लक्ष देण्याऐवजी तेजस्वींनी मत चोरी आणि ईव्हीएम हॅकिंग या मुद्द्यांना जास्त प्राधान्य दिले.

महिलांच्या विक्रमी मतदानामुळे समीकरण बदललं

या निवडणुकीत महिलांनी विक्रमी मतदान केलं. नितीश कुमार यांच्या दारूबंदी, सायकल योजना, महिला सुरक्षा, आरक्षण अशा योजनांचा थेट फायदा जेडीयू–भाजपला झाला. दरम्यान, तेजस्वींच्या "१० लाख नोकऱ्या" या घोषणेने महिलांना आकर्षित करण्यात यश मिळालं नाही.

बिहारमध्ये उत्सुकता शिगेला

बिहारमधील दोन्ही टप्प्यांचे मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी पार पडले. मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याने निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. आज निकालाचा दिवस आहे. बिहारमध्ये पुढचे सरकार कोण स्थापन करणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अंतिम चित्र लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : पैशांची भरभराट होईल, शेतीमधूनही होणार फायदा; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या गोष्टी घडतील

Maharashtra Live News Update: पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी अपडेट,शीतल तेजवानीला नोटीस

आबा, तात्या! आयुष्यमान कार्ड आहे का? मग लगेच 'हे' काम करा, नाहीतर ५ लाखांचा होईल तोटा

6,6,6,6,6,6,6,6,6,6...वैभव सूर्यवंशीची जोरदार फलंदाजी, ४२ चेंडूत कुटल्या १४४ धावा

Bihar Election Result Live Updates : काँग्रेस मुस्लीम लीग माओवादी पक्ष झालाय; पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT